Marathi News> मनोरंजन
Advertisement

जेव्हा कास्टिंग काऊचमध्ये अडकला इरफान खान

कुणी का केलं असं 

जेव्हा कास्टिंग काऊचमध्ये अडकला इरफान खान

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान 2012 मध्ये आलेला सिनेमा पान सिंह तोमर खूप चर्चेत होता. इरफान खानला या सिनेमातून एक वेगळीच ओळख मिळाली. एक अॅथलीट डाकू होतो या प्रवासावर हा सिनेमा निर्माण करण्यात आला. याच सिनेमा दरम्यान कास्टिंग काऊचचा आरोप लावण्यात आला. 

हा सिनेमा प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीला पडलं. या सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. वाचून आश्चर्य वाटेल पण इरफान करिअरच्या प्रगतीवर असतानाच पान सिंह तोमर या सिनेमामुळे त्याच्यावर कास्टिंग काऊचचा आरोप लागला. सिनेमातील अभिनेत्री ममता पटेलने इरफानवर कास्टिंग काऊचचा आरोप लावला, अशी चर्चा आहे. 

हा सिनेमा पान सिंह तोमर या सैनिक जो खेळाडू होता याची गोष्ट आहे. तो मध्य प्रदेशचा भिडौसा येथील रहिवाशी आहे. त्याला आपल्या धावण्यातलं वेगळेपण हे भारतीय सेनेत गेल्यावर कळलं. ते सात वेळा राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. त्यांनी 1958 मध्ये आशियाई खेळात भाग देखील घेतला आहे. 

Read More