Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तुला माझी गरज असेल तर...' आमिर खान आयराशी कसा वागतो? स्वत:हून केला खुलासा

Ira Khan:  अभिनेत्री आयरा खान हिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. आजही तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. सध्या तिनं आपल्या एका मुलाखतीतून आपल्या आणि आपल्या आईवडिलांच्या नात्यावर भाष्य केले आहे. 

'तुला माझी गरज असेल तर...' आमिर खान आयराशी कसा वागतो? स्वत:हून केला खुलासा

Ira Khan: आमिर खान याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. त्यातून त्याच्या लेकीचीही चर्चा ही रंगलेली असते. सध्या आयरा खानची जोरात चर्चा आहे. आयरा खान ही अभिनेत्री आणि कलाकारही आहे त्यातून ती मानसिक आरोग्यावरही अनेकदा भाष्य करताना दिसते. अशा अनेक उपक्रमांवरही ती काम करताना दिसते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही रंगलेली असते. यावेळीही तिची जोरात रंगलेली आहे. सध्या तिनं आपल्या आणि आपल्या पालकांवरील नात्यावर भाष्य केले आहे. एका मुलाखतीतून तिनं याचा खुलासा केला आहे. आयरा खानचे आईवडिल रीना दत्ता आणि आमिर खान यांनी 2002 साली घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांच्या मुलांची कस्टडी ही रीना दत्ता यांनी घेतली होती. आयरा खान आणि आमिर खान यांचे नातेही फार चांगले आहे. ते अनेकदा एकत्र स्पॉट होतात आणि बऱ्याचदा एकत्र मुलाखतींमध्येही सहभागी होताना दिसतात. 

त्यामुळे त्यांची जोरात चर्चा ही रंगलेली असते. सध्या आयरा खान हिनं 'इंडिया टूडे'ला एक मुलाखत दिली आहे ज्याची बरीच चर्चा ही रंगलेली आहे. यावेळी इंडिया टूडे कॉन्क्लेव्हमध्ये ती सहभागी झाली होती. ज्यावेळ तिनं आपल्या आईवडिलांसोबतच्या नात्यावर खुलासा केला आहे. यात ती म्हणाली की, ''माझ्या दोन्ही पालकांसोबत माझे संबंध अगदी चांगले आहेत. मी या नात्यावर चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या आईवडिलांससोबत असणारं माझं नातं हे अत्यंत खास आहे. मोस्ट कॉम्लिकेटेड आहे. जे आपले पालक काय सांगत आहेत याचा जर का आदर केलात तर त्यानं तुम्हाला आनंदही होतो अगदी दोन्ही बाजूंनी.'' असं ती म्हणाली.

हेही वाचा : सुनील दत्त यांचा रोमॅण्टिक सीन शुट होत असताना नर्गिस आल्या आणि...

आपल्या आईवडिलांच्या नात्याबद्दल ती पुढे म्हणाली की, 'मला असं वाटतंय की माझा योग्य संवाद हा माझ्या वडिलांपेक्षा माझ्या आईशी फार चांगला आहे. पण मी त्या दोघांमध्ये माझा संवाद ठेवते. मला माहिती आहे की माझे वडिल हे कायमच बिझी असतात. परंतु ते नेहमी मला सांगतात की तुला माझी गरज असेल तर मला फोन कर कधीही. त्यातून माझीही आई तिच्या आईवडिलांचा सांभाळ करण्यात व्यस्त असते.' यापुढे ती म्हणाली की, 'दोघांसोबत ती समान नातं शेअर करते.' 

Read More