Marathi News> मनोरंजन
Advertisement

India vs New Zealand: भगवान को मानते हो? नेटफ्लिक्सचे ट्विट व्हायरल

टीम इंडिया संकट मे है

India vs New Zealand: भगवान को मानते हो? नेटफ्लिक्सचे ट्विट व्हायरल

मुंबई: विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडिया बिकट अवस्थेत सापडली आहे. न्यूझीलंडच्या २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात वाईट झाली. त्यामुळे भारतीय चाहते प्रचंड निराश झाले आहेत. सोशल मीडियावर या सगळ्याचे पडसाद उमटत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक मजेशीर मिम्स व्हायरल होत आहेत. 

या पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्स इंडियानेही एक ट्विट केले आहे. भारतीय संघ अत्यंत बिकट अवस्थेत सापडला आहे. अशावेळी टीव्हीवर मॅच पाहत असलेल्या भारतीय चाहत्यांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो, भगवान को मानते हो? तुमचा देवावर विश्वास असेल तर कृपया प्रार्थना करा, असे नेटफ्लिक्सने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

एकूणच तमाम भारतीय क्रिकेट चाहते टीम इंडियाच्या विजयासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. सध्या महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजाची जोडी मैदानात आहे. हे दोघे भारतीय संघाला विजय मिळवून देतील, अशी आशा भारतीय क्रीडा चाहत्यांना आहे. 

Read More