Marathi News> मनोरंजन
Advertisement

स्टेजवर घडला धक्कादायक प्रकार; ज्यामुळे धर्मेंद्र यांनी स्पर्धकाला मारला बुक्का

'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये आज बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र गेस्ट म्हणून दिसणार आहेत.

स्टेजवर घडला धक्कादायक प्रकार; ज्यामुळे धर्मेंद्र यांनी स्पर्धकाला मारला बुक्का

मुंबई : 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये आज बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र गेस्ट म्हणून दिसणार आहेत. धर्मेंद्र यांच्या आगमनाने शोमध्ये धमाल वातावरण पाहायला मिळणार आहे. नुकताच चॅनलने आजच्या भागाचा प्रोमोही शेअर केला आहे. ज्यामध्ये धर्मेंद्र भावूक होताना दिसत आहेत. तरीही ते स्पर्धकांसोबतही थिरकताना दिसणार आहे. त्याचबरोबर प्रोमोमध्ये धर्मेंद्र एका स्पर्धकाला जोरदार बुक्का मारताना दिसत आहेत. मात्र यामागचं कारण काय आहे, हे एपिसोड पाहिल्यानंतरच कळेल.

धर्मेंद्र पहिल्यांदा मुलींच्या ग्रुपसोबत डान्स करत असल्याचं प्रोमोमध्ये दिसतंय. तर दुसऱ्या क्षणाला ते दुसऱ्या ग्रुपमधल्या एका मुलाला बुक्का मारतायेत. हे करत असताना ग्रुपमधल्या बाकीच्या मुली हसत असल्या तरी साहजिकच धर्मेंद्र चित्रपटातील एखादा सीन रिपीट करत असावेत असं वाटतय.

किरणखेर यांनी का हातात घेतली बंदूक? 
केवळ डान्स आणि अॅक्शनच नाही तर जेव्हा धर्मेंद्र इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये पोहोचले तेव्हा शोचा जज बादशाहने त्यांना एक खास विनंती केली. जी धर्मेंद्र नाकारू शकले नाही. 'शोले' चित्रपटातील सीन पुन्हा रिक्रेएट करण्याची ही खास विनंती होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ज्यामध्ये वीरू धर्मेंद्र होते, आणि बसंती किरण खेर बनल्या. शोलेचा सीन, ज्यात धर्मेंद्र बसंतीला बंदुकीने आंबे तोडायला शिकवतो, तो किरण खेरने धर्मेंद्रसोबत पुन्हा केला होता. किरण आणि धर्मेंद्र दोघंही हा सीन मस्ती करताना दिसत आहेत. तर बाकीचे जज हा सीन पाहून जोरजोरात हसू लागतात.

Read More