Marathi News> मनोरंजन
Advertisement

२५ कन्नड अभिनेते आणि प्रोड्यूसर्सच्या घरी आयकर विभागाची धाड

कन्नड स्टार्सच्या घरी आयकर विभागाची धाड

२५ कन्नड अभिनेते आणि प्रोड्यूसर्सच्या घरी आयकर विभागाची धाड

बंगळुरु :  आज आयकर विभागाने अनेक कन्नड अभिनेत्यांच्या घरी धाडी टाकल्या. सकाळी ८ वाजेपासून हे धाडसत्र सरु झालं. आयकर विभागाच्या ६ अधिकाऱ्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहे. आयकर विभागाने अनेक कन्नड स्टार्सच्या घरी या धाडी टाकल्या. ज्यामध्ये सुदीप, KGF फेम यश, शिवराजकुमार, पुनीत कुमार आणि KGF चे प्रोड्यूसर विजय किरगंदूर यांची नावे देखील आहेत. 

25 स्टार्सच्या घरी धाड

आयकर विभागाच्या रेड मागचं कारण अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पण काळापैशांचा संग्रह केल्यामुळे ही धाड टाकण्यात आल्याच्या चर्चा आहेत. एकूण २५ कन्नड स्टार्सच्या घरी धाड पडल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे. 

बॉलिवूड लाईफच्या बातमीनुसार जेव्हा धाड टाकण्यात आली तेव्हा यश, पुनीत राजकुमार, शिवराजकुमार, सुदीप आणि विजय यांनी कोणतीही माहिती नाही दिली. सध्या कागजपत्रांची छाननी सुरु आहे.

आयकर विभागाचा हा छापा केजीएफ सिनेमाला मिळालेल्या यशानंतर पडल्याने चर्चा रंगल्या आहेत. कन्नड फिल्म इंडस्ट्रीच्या  इतिहासात KGF सिनेमाने आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई केली आहे. हा सिनेमा १५० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे, लवकरच २०० कोटींचा आकडा देखील सिनेमा गाठेल अशी शक्यता आहे. अधिकारी अभिनेता आणि प्रोड्यूसर रॉकलाइन वेंकटेश यांच्या संपत्तीची चौकशी करत आहेत.

Read More