Marathi News> मनोरंजन
Advertisement

'दबंग ३' मध्ये झळकणार मराठी अभिनेत्याची मुलगी

 'दबंग-३' चित्रपट २० डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'दबंग ३' मध्ये झळकणार मराठी अभिनेत्याची मुलगी

मुंबई : बॉलिवडमध्ये दबंग अभिनेता सलमान कित्येकांचा गॉड फादर म्हणूण ओळखला जातो. अनेक अभिनय प्रेमिंसाठी त्यांने बॉलिवूडचे दालन उपलब्ध करून दिले आहे. आता सुद्धा 'दबंग ३' चित्रपटात असंच चित्र अनुभवायला मिळणार आहे. मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी सई 'दबंग ३' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. याआधी मांजरेकरांची मोठी मुलगी अश्वमी मांजरेकर दबंगमधून रूपेरी पडद्यावर प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

चूलबूल पांडेच्या भूमिकेत झळकणाऱ्या सलमानच्या तरूणपणाच्या प्रेयसीच्या भूमिकेत सई दिसणार आहे. सलमानच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री सोनीक्षी सिन्हा झळकणार आहे. त्याचप्रमाणे अभिनेता विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर प्रजापती पांडे यांची भूमिका प्रमोद खन्ना साकारणार आहे.   

'भारत' चित्रपटाच्या दमदार यशानंतर सलमानची पाऊले 'दबंग ३'च्या चित्रपटाच्या चित्रीकरणाकडे वळली आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 'दबंग-३' चित्रपट २० डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Read More