Marathi News> मनोरंजन
Advertisement

IIFA 2018 : रेखाचा 'प्यार किया कोई चोरी नई की...' या गाण्यावर अफलातून परफॉर्मन्स

रेखाचे व्हिडिओ व्हायरल 

IIFA 2018 : रेखाचा 'प्यार किया कोई चोरी नई की...' या गाण्यावर अफलातून परफॉर्मन्स

मुंबई : थायलँडची राजधानी बँकॉकमध्ये 19 व्या आयफा अवॉर्ड्स (IFFA2018) सोहळ्यात अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. पण या सोहळ्यात एका खास व्यक्तीची उपस्थिती चर्चेत राहिली. ती व्यक्ती म्हणजे 64 वर्षाची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा.  रेखा यांनी आपल्या अदांनी आणि नखऱ्यांनी प्रेक्षकांच मन जिंकलं. अनेक कलाकार उपस्थित राहूनही रेखा यांच्या परफॉर्मन्सची चर्चा रंगली आहे. कारण रेखा या तब्बल 20 वर्षानंतर स्टेजवर उतरल्या. ट्रेडिशनल अवतारात दिसलेली रेखा IFFA मध्ये एव्हरग्रीन साँगवर डान्स करताना दिसली. प्रेक्षकांनी 'मुगल -ए-आजम' या गाण्यावर रेखाने केलेला परफॉर्मन्स उचलून धरला. 

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलाम-ए-इश्क मेरी जा.... प्यार किया कोई चोरी नहीं की... आणि थारे रहिए ओ बांके यार... सारख्या गाण्यावर रेखा थिरकताना दिसली. रेखाच्या या परफॉर्मन्समधून ती पुन्हा जुन्या अंदाजात दिसली. 64 वर्षाची अभिनेत्रीने 1970 मध्ये आलेला 'मुकद्दर का सिंकदर', 'मुगल-ए-आजम','पाकीजा' सारख्या सिनेमांत तिने उत्तम डान्स केला आहे.

रेखाच्या डान्स परफॉर्मन्स किती सुंदर होता याचा अंदाज तुम्ही लावू शकता. या व्हिडिओसोबत एक फोटो देखील व्हायरल होत आहे. यामध्ये रेखाला श्रद्धा कपूरने मिठी मारली. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की हा परफॉर्मन्स किती सुंदर झाला.

Read More