Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी कोणाला दोष देत नाही, पण...' बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी नोरा फतेहीने केली ही गोष्ट

नोरा लवकरच 'मडगांव एक्सप्रेस'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच नोराने सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान आपल्या करिअरच्या चांगल्या वाईट दिवसांबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

'मी कोणाला दोष देत नाही, पण...' बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी नोरा फतेहीने केली ही गोष्ट

मुंबई : नोरा फतेहीला आज कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाहीये. नोरा फतेहीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. जरी ही अभिनेत्री भारतीय नसली तरी, तिचा भारतात खूप मोठा चाहता वर्ग आहे. सिनेसृष्टीची पार्श्वभूमी नसताना नोराने स्वत:च विश्व निर्माण केलं आहे आणि इथपर्यंत पोहचण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. नोराने एक डान्सर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली मात्र ती एक जबरदस्त अभिनेत्रीदेखील आहे. अभिनेत्रीने टीव्ही शोमध्ये जज आणि म्युझिक व्हिडीओमध्ये देखील पाहिलं गेलं आहे. मात्र आता तिला सिनेमात खूप चांगल्या भूमिका मिळत आहेत. 
 
नोरा लवकरच 'मडगांव एक्सप्रेस'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच नोराने सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान आपल्या करिअरच्या चांगल्या वाईट दिवसांबद्दल मोठा खुलासा केला आहे. या निमीत्ताने जेव्हा एक्ट्रेसने विचारलं की, सिनेमात रोल मिळवण्यासाठी तिला कसा संघर्ष करावा लागतो याच्या उत्तरात नोराने सांगितलं की, 'मी माझ्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली. यापूर्वी मी अनेक चित्रपटांमध्ये आयटम साँग केले आहेत. एकवेळ अशी आली होती की मला  असं वाटू लागलं की, मला टाईपकास्ट केलं जात आहे. आणि मला स्वतःला रिपीट करणं आवडत नाही.'' 

चॅलेंज फेज करण्यासाठी तयार आहे नोरा 
दिलेल्या मुलाखतीत नोरा पुढे म्हणाली, 'इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही एका डान्सरला  गंभीर भूमिकांसाठी कास्ट करू इच्छित नाही. लोकांना वाटयचं की, मी फक्त आयटम साँगच करू शकेन  दुसरं काही नाही, मात्र मला त्यांचे विचार पूर्णपणे बदलायचे आहेत. मला वाटतं की, लोकांना वाटतं की, मी कोणताही रोल निभवू शकते आणि मी प्रत्येक चॅलेंजचा सामना करण्यासाठी तयार आहे.

या सिनेमात झळकणार नोरा
तर नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, 'मडगाव एक्सप्रेस'मधून प्रेक्षकांच्य भेटीला येणार आहे. या व्यतिरिक्त अभिनेत्री डान्सिंग डॅड आणि मटका सिनेमात झळकणार आहे. अशातच आता नोराचे चाहते तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत. 

Read More