Marathi News> मनोरंजन
Advertisement

'शेरनी' सिनेमा कायदेशीर अडचणीत अडकण्याची शक्यता, विद्या बालनच्या या सिनेमावर 'हा' नेमबाज आहे नाराज

अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या विद्या बालन स्टारर फिल्म 'शेरनी' वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'शेरनी' सिनेमा कायदेशीर अडचणीत अडकण्याची शक्यता, विद्या बालनच्या या सिनेमावर 'हा' नेमबाज आहे नाराज

मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या विद्या बालन स्टारर फिल्म 'शेरनी' वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हैद्राबादचा नेमबाज असगर अली खान चित्रपट निर्मात्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे. असगर अली खान यांनी सुमारे १५ दिवसांपूर्वी चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती, मात्र त्याबद्दलच्या उत्तराबाबत ते समाधानी नाहीत.

कायदेशीर अडचणीत अडकू शकते 'शेरनी'
असगर अली खान म्हणाले की, 'अवनी' या शेरनीच्या हत्येबाबत चित्रपटात तथ्य विकृत केली गेली आहेत. असगर अली खान यांनी दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, 'आम्ही आमच्या कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करत आहोत. मात्र, आम्ही याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही.

असगर सरकारच्या हाकेला गेले होते
असगर अली खान सुप्रसिद्ध नेमबाज नवाब सफत अली खान यांचा मुलगा आहेत. ज्यांनी सन 2018 मध्ये यवतमाळ येथे महाराष्ट्राच्या यवतमाळ येथे अवनीची हत्या केली होती. असगर अली खान यांनी असा आरोप केला आहे की, या चित्रपटामध्ये त्यांना 'ट्रिगर-हॅपी शूटर्स' अशी व्यक्तिरेखा दिली आहे. ते म्हणाले, 'आम्ही सरकारच्या आवाहनावर तिथे गेलो आणि 14 माणसांना खाणाऱ्या वाघिणीची आम्ही हत्या केली, पण आपण मनोरंजनासाठी शिकार करत असल्याचं चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे.'

fallbacks

आगीत तेल ओतण्याचं काम करत आहे चित्रपट?
असगर अली खान म्हणाले की, या चित्रपटामुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. संवेदनशील असलेल्या विषयावर आगीत तेल ओतण्याचं काम हा सिनेमा करु शकतो. असगर अली खान असंही म्हणाले की, चित्रपटातील विकृत तथ्य कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करतात.

Read More