Marathi News> मनोरंजन
Advertisement

स्वत:ची तुलना कोणासोबत करू नको, ऋतिकने दिल्या मुलाला वाढदिवसच्या शुभेच्छा

मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

स्वत:ची तुलना कोणासोबत करू नको, ऋतिकने दिल्या मुलाला वाढदिवसच्या शुभेच्छा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनच्या मुलाने आज ११व्या वर्षात पदार्पण केले. मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ऋतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपल्या मुलाला शुभेच्छा दिल्या. ऋदान रोशनचा एक व्हिडीओ व्हायरल करत त्याने अत्यंत प्रेरणादायी कॅप्शन दिले आहे. मुलाचा आत्मविश्वास वाढण्याच्या दृष्टीने त्याने हे पोस्ट केले आणि मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कॅप्शनमध्ये ऋतिक म्हणतो की, 'स्वत:च्या जीवनाला प्रोत्साहीत कर, स्वत:ला प्रोत्साहीत कर.. कधीही गर्दीचा पाठलाग करू नको, नेहमी स्वत:च्या आनंदाचा शोध घे, स्वत:ची तुलना कोणासोबतही करू नको, दिवसाची सुरूवात नेहमी उत्साहीत कर, खूप मेहनत कर, तूला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.'

 

त्याचप्रमाणे सुझेन खानने सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋदानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुझेनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सध्या ऋतिक त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 'सुपर ३०' चित्रपटात तो भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाची कथा गणितज्ञ आनंद कुमार यावर आधारित आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विकास बहल यांच्या खांद्यावर आहे.  

 

Read More