Marathi News> मनोरंजन
Advertisement

Hrithik Roshan ने अनेकांची मनं जिंकली, सार्वजनिक ठिकाणी धरले चाहत्याचे पाय, पाहा Video

सार्वजनिक ठिकाणी Hrithik Roshan ने का धरले चाहत्याचे पाय? व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...  

Hrithik Roshan ने अनेकांची मनं जिंकली, सार्वजनिक ठिकाणी धरले चाहत्याचे पाय, पाहा Video

मुंबई : अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) अभिनय आणि परफेक्ट फिटनेसने चाहत्यांची मनं जिंकलं. नुकताच अभिनेता एका कार्यक्रमात पोहोचला जिथे त्याच्या एका गोष्टीची खूप चर्चा होत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने असे काय केले की, तो प्रसिद्धीच्या झोतात आला. सध्या अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हृतिक चक्क एका चाहत्याचे पाय धरताना दिसत आहे. 

हृतिक रोशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका इव्हेंटमध्ये त्याच्या फॅन्सच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहे. हृतिकचा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. अभिनेत्याच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. पाहा व्हिडीओ... 

हृतिकच्या सिनेमांबद्दल सांगयचं झालं तर, अभिनेता लवकरच 'विक्रम वेधा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. त्याचा अॅक्शन-थ्रिलर सिनेमा तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. जो या वर्षी प्रदर्शित होणार आहे. विक्रम वेधा सिनेमात हृतिक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

हृतिक सध्या त्याच्या प्रोफेशन आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे 'विक्रम वेधा' सिनेमा तर, दुसरीकडे हृतिकचं सबा आजादसोबत असलेलं नातं. एवढंच नाही हॉतिक आणि सबा लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

Read More