Marathi News> मनोरंजन
Advertisement

मुलगी पसंत? Hrithik Roshan ची आई सबा आझादबद्दल हे काय म्हणाली...

दोघेही पहिल्यांदाच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये हातात हात घालून दिसले.

 मुलगी पसंत? Hrithik Roshan ची आई सबा आझादबद्दल हे काय म्हणाली...

मुंबई : हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या रिलेशनशीपबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सबा आझाद ही हृतिक रोशनची जवळची मैत्रीण असल्याचं देखील बोललं जातं.

पण अनेकदा हृतिक सबासोबत डिनर डेटवर दिसत असल्याने दोघेही डेट करत असल्याचं अनेकांना वाटत आहे. दोघेही पहिल्यांदाच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये हातात हात घालून दिसले.

तर काही दिवसांपूर्वी सबा आझाद हृतिक रोशनच्या कुटुंबासोबत दिसली होती. त्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.

फोटो पाहून असे वाटले की, हृतिकने सबाची त्याच्या आई-वडिलांशी आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी ओळख करून दिली आहे. हृतिकची आई पिंकी रोशनला सबा आझाद आवडत असल्याचं समोर आलं आहे. 

 सबा आझादने तिच्या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तिने काळ्या रंगाचा टॉप आणि पँट असा लूक केला आहे. ऑड्रे हेपबर्न एक ब्रिटिश अभिनेत्री होती.

fallbacks

हृतिकची आई पिंकी रोशन यांना सबाचा हा लूक खूप आवडला आहे. या लूकचे कौतुक करताना पिंकी यांनी कमेंटमध्ये लिहिले की, "हा लूक खूप क्यूट आहे, हा हेपबर्नच्या फोटोप्रमाणेच वाटत आहे."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सबाची हृतिकच्या कुटुंबियांसोबतची बॉण्डिग पाहता लवकरच हृतिकच्या घरी सनई चौघडे वाजणार असल्याचं बोललं जात आहे. हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो सैफ अली खानसोबत विक्रम वेध या चित्रपटात दिसणार आहे.

याशिवाय तो फायटर या चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत अॅक्शन अवतारात दिसणार आहे. तिचा हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. सबाविषयी सांगायचे तर ती संगीतकार असली तरी नुकतीच ती रॉकेट बॉईज नावाच्या वेब सीरिजमध्ये दिसली.

Read More