Marathi News> मनोरंजन
Advertisement

हिना खानवर पैशांच्या अफरातफरीचा आरोप ; दिले चोख उत्तर

बिग बॉस फेम हिना खान सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. 

हिना खानवर पैशांच्या अफरातफरीचा आरोप ; दिले चोख उत्तर

मुंबई : बिग बॉस फेम हिना खान सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. मात्र आता हिना एका वादात फसली आहे. हिना खानवर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वतःवर लागलेल्या या आरोपाचे चोख उत्तर हिनाने सोशल मीडियावर दिले आहे. 

पैशांच्या अफरातफरीचा आरोप

एका हिंदी न्युज चॅनलने हिनावर पैशांच्या अफरातफरीचे आरोप देणारी एक बातमी चालवली. हिनाने एका इव्हेंटसाठी १२ लाखांची ज्वेलरी घेतली होती. पण इव्हेंट संपला तरी तिने ती परत केली नाही. यानंतर ज्वेलरी डिजाईनरने हिना खानला कायदेशीर नोटीस पाठवली. अशी ही बातमी होती. यावर हिनाने सोशल मीडियावरुन उत्तर दिले आहे.

हिनाने लिहिले की, मी हैराण आहे की जी काही कायदेशीर नोटीस पाठवली गेली, ती अजूनही माझ्या घरी आलेली नाही. पण मीडिया हाऊसेसपर्यंत पोहचली. टीकाकारांनो तुमची ही ट्रिक चालली नाही. कोणतीतरी नवी ट्रिक ट्राय करा.

नवा म्युझिक व्हिडिओ

बिग बॉस ११ चे सीजन संपल्यानंतरही अभिनेत्री हिना खानचा जलवा कायम राहिला. तिचा नवा म्युझिक व्हिडिओही नुकताच लॉन्च झाला. या व्हिडिओला 8,154,060 व्हीयूज मिळाले. हिनाच्या या म्युझिक व्हिडिओमध्ये सोनू ठकरालने गाणे गायले आहे. तर प्रधानने रॅप केले आहे. येथे पहा गाणे...

Read More