Marathi News> मनोरंजन
Advertisement

'कलाकार Insecure च असतात'; शर्मिन सेगल - अदिती राव हैदरी यांच्या वादाचा 'तो' VIDEO व्हायरल

Heeramandi Aditi Rao Hydari Sharmin Segal Video : हीरामंडी या सीरिजमध्ये एकत्र काम केलेल्या शर्मिन सेगल आणि अदिती राव हैदरी यांच्यातील वादाचा व्हिडीओ व्हायरल

'कलाकार Insecure च असतात'; शर्मिन सेगल - अदिती राव हैदरी यांच्या वादाचा 'तो' VIDEO व्हायरल

Heeramandi Aditi Rao Hydari Sharmin Segal Video : लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी ही वेब सीरिज सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावर त्यांच्या या सीरिजची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्याशिवाय या सीरिजमधील कलाकार देखील तितकेच चर्चेत आहेत. आता या सीरिजमध्ये दिसलेली अभिनेत्री शर्मिन आणि अदिती राव हैदरी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शर्मिननं या सीरिजमध्ये आलमजेबची भूमिका साकारली होती. तर अदितीनं बिब्बो जान ही भूमिका साकारली. आता या दोघींता एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात शर्मिन बोलते की 'कलाकार Insecure च असतात'. शर्मिनच्या या वक्तव्यावर अदितीनं उत्तर दिलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर शर्मिन आणि अदितीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ डिजीटल राबता या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत शर्मिन बोलताना दिसते की 'कलाकार Insecure च असतात'. त्यावर अदिती तिला मध्येच थांबवत बोलते नाही, कारण कलाकार हे देखील व्यक्ती आहेत. शर्मिन तरी बोलते की जर तुम्ही इनसिक्योर आहात, सोनाला यातून बाजूला ठेवा कारण सोना खूप सिक्योर आहे हे माहित आहे. पण पाहायचं झालं तर इनसिक्योरिटीमध्ये देखील एक जादू आहे. जर इनसिक्योर नाही आहात तर तुम्ही स्वत: ला पुढे कसे घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल. इनसिक्योर असण्यात देखील मज्जा आहे. अदिती म्हणाली की नाही, नाही, इनसिक्योरिटी बकवास आहे. मी अशी नाही. तर शर्मिननं केलेलं हे वक्तव्य पाहताच अदिती आणि सोनाक्षी यांचे जे हावभाव होते ते पाहण्यासारखे आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, नेटकऱ्यांचे या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं की अदिती ज्या प्रकारे डोळे फिरवते त्यावरून असं वाटतंय की ती बोलते जाऊ दे सोडून देते. दुसरा नेटकरी म्हणाला, सोनाक्षीला तर तिचं हसू अनावर होत आहे. तिसरा नेटकरी म्हणाला की या सीरिजपेक्षा त्यांच्या प्रमोशनचे व्हिडीओ जास्त मनोरंजन करत आहेत. 

हेही वाचा : 'कोणी दुसरंच घेऊन गेलं...', ऐश्वर्यावरुन सलमान आणि विवेक ओबेरॉयमध्ये झालेल्या भांडणावर सलीम खान यांनी केले होते वक्तव्य

हीरामंडी विषयी बोलायंच झालं तर ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून शर्मिन ही सतत ट्रोल होत आहे. सीरिजमध्ये दिसणारे कलाकारांनी तिला पुढे येऊन पाठिंबा दिला आहे. त्यात अदिती राव हैदरी, ताहा शाह, शेखर सुमन, शर्मिन या कलाकारांची नावं आहेत. तर शर्मिल ट्रोल होण्याचं कारण तिचा अभिनय किंवा तिची भूमिका नाही तर ती संजय लीला भन्साळी यांची भाची आहे. 

Read More