Marathi News> मनोरंजन
Advertisement

आणखी काय उरलंय? अनन्या पांडे- आदित्य रॉयचा रोमॅन्टिक व्हिडीओ पाहून चात्यांनाही पडला प्रश्न

बी-टाऊनची एक अगदी फ्रेश जोडी. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे. ज्यांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र ही जोडी अनेकदा अनेक ठिकाणी स्पॉट होत असते. दोघंही अनेकदा एकमेकांवर लपून छपून प्रेम करताना दिसतात. 

आणखी काय उरलंय? अनन्या पांडे- आदित्य रॉयचा रोमॅन्टिक व्हिडीओ पाहून चात्यांनाही पडला प्रश्न

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा आहे. दोघंही कधी वेकेशनवर तर कधी लंच आणि डिनर डेटवर दिसतात. या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नसले तरी त्यांच्या प्रेमाची चर्चा चित्रपट वर्तुळात होत आहे. आता पुन्हा एकदा हे कपल एकदा एकत्र दिसले आहेत.

बी-टाऊनची एक अगदी फ्रेश जोडी. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे. ज्यांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र ही जोडी अनेकदा अनेक ठिकाणी स्पॉट होत असते. दोघंही अनेकदा एकमेकांवर लपून छपून प्रेम करताना दिसतात.  अनेकदा या दोघांचे व्हिडिओही समोर येत असतात. असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे दोन्ही लव्हबर्ड्स एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत. आता पुन्हा एकदा दोघं एकमेकांच्या खूप जवळ आलेले दिसत आहेत. 

या व्हिडीओत अनन्याने आदित्यचा हातच धरलेला दिसत आहेत तर अनन्याने देखील आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे.  या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचा एक लेटेस्ट व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटमधला आहे. आदित्य कोणाशी तरी बोलत आहे आणि त्याची गर्लफ्रेंड अनन्याही त्याच्यासोबत उभी आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांचे म्हणणं आहे की, अनन्याने ज्या प्रकारे आदित्यचा हात धरून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे, त्यावरून दोघंही एकमेकांच्या प्रेमात असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ कोणीतरी गुपचूप शूट केला आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आदित्य 'गुमराह' चित्रपटात दिसला होता. 'द नाईट मॅनेजर' या वेबसिरीजमध्येही आदित्य दिसला होता. तरतो  2024 मध्ये 'मेट्रो...इन दिन'मध्ये दिसणार आहे. अनन्याबद्दल सांगायचं झालं तर 'खो गये हम कहाँ', 'कंट्रोल' आणि 'शंकारा' सारखे तिचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, अनन्या तिच्या BFF सुहाना खान आणि शनाया कपूरसोबत हँग आउट करताना देखील दिसत असते.

Read More