Marathi News> मनोरंजन
Advertisement

खूपच साधं आहे भाऊ कदम यांचं घरं; पाहा फोटो

 कॉमेडीच्या टॉप अभिनेत्यांमध्ये भाऊ कदम यांच्या नावाचा सामावेश होतो. भाऊ कदम नेहमीच त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतात.  त्यांच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी कायम आवडतं.भाऊ कदम यांनी हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोत भाऊ यांच्या घराची एक झलक दिसत आहे. 

खूपच साधं आहे भाऊ कदम यांचं घरं; पाहा फोटो

मुंबई : अभिनेते भाऊ कदम चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून घरा-घरात पोहचले. भाऊ यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. कॉमेडीच्या टॉप अभिनेत्यांमध्ये भाऊ कदम यांच्या नावाचा सामावेश होतो. भाऊ कदम नेहमीच त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. लोकांनाही त्यांच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी कायम आवडतं. आज आम्ही तुम्हाला भाऊ कदम यांच्या गावच्या घराविषयी सांगणार आहोत. खरंतर भाऊ कदम हे मुळचे कोकणातील कणकवली गावचे. अनेकदा भाऊ आपल्या गावच्या घराला भेटही देत असतात. नुकतीच भाऊ यांनी त्यांच्या गावच्या घराला भेट दिली याचेच काही खास फोटो भाऊ यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत भाऊ कदम यांच्यासोबत त्यांचे भाऊही दिसत आहेत. ब्लॅक अँण्ड व्हाईट हा फोटो पाहून चाहत्यांनी त्यांच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. 

भाऊ कदम यांनी हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोत भाऊ यांच्या घराची एक झलक दिसत आहे. या फोटोत भालचंद्र कदम लाकडाच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. तर त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर त्यांचे भाऊ दिसत आहेत. शेणाची जमीन, याचबरोबर घराच्या वरच्या बाजूला वासेंवर घराचे मोठेपण आईच्या हाती असते, निंदकाचे घर असावे शेजारी हा सुविचार लिहीलाय. 
तर भाऊ यांच्या उजव्या बाजूला एक बाकडा आहे. त्या बाकड्यावर एक हार्मोनिअम आहे. या फोटोवरुन भा कदम हे खऱ्या आयुष्यातही किती साधेपणा जपतात हे यावंरुन दिसून येत. व्हायरल होणारे फोटो सध्या सोशल मीडयावर व्हायरल होत आहेत. एक महिन्यांपुर्वी शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यांच्या या फोटोंवर आणि साधेपणावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करुन त्यांचं कौतुक केलंय. याचबरोबर या फोटोत त्यांच्या भावाला पाहून दोघंही एकमेंकासारखे दिसतात असं म्हटलंय, एका चाहत्याने कमेंट करत म्हटलंय, भाऊ कदम आणि कदम भाऊ आरसा तर अजून एकाने म्हटलंय, ह्या दोन्ही भाऊ कदम ना शेम टू शेम चित्रपटात घ्यायला हवे होते. तर अजून एकाने म्हटलंय, अशी ही बनवा बनवी तर अजून एकाने म्हटलंय, प्रत्येक गावाकडच्या घरात जी तुळवी असते त्यावर काहीनाकाही लिहलेले असतेच..माझ्या आजोळी तर गायत्री मंत्र लिहिला होता आजोबांनी, जेव्हा घराचे बांधकाम झाले असेल तेव्हा....

अनेकजण त्यांच्या या फोटोवर अशाप्रकारच्या कमेट्स करत आहेत. भाऊ हे मराठीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते आहेत. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात ते दिसतात. तर सध्या अनेक सिनेमा त्यांच्या पाईपलाईनमध्ये आहेत.

Read More