Marathi News> मनोरंजन
Advertisement

HBD SRK: शाहरूख खानचे 5 वाद राहिले चर्चेत, आर्यनमुळे शेवटी...

Shah Rukh Khan Controversies: बॉलिवूड सुपरस्टार आणि किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला शाहरुख खान वयाची 57 वर्षे पूर्ण करत आहे. दिवाना चित्रपटातून शाहरूख खाननं बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होते. त्यानंतर सुरु झालेल्या प्रवासात शाहरूख खाननं मागे वळून पाहिलं नाही.

HBD SRK: शाहरूख खानचे 5 वाद राहिले चर्चेत, आर्यनमुळे शेवटी...

Shah Rukh Khan Controversies: बॉलिवूड सुपरस्टार आणि किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला शाहरुख खान वयाची 57 वर्षे पूर्ण करत आहे. दिवाना चित्रपटातून शाहरूख खाननं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होते. त्यानंतर सुरु झालेल्या प्रवासात शाहरूख खाननं मागे वळून पाहिलं नाही. चित्रपटसृष्टीतील उत्तुंग कामगिरीसाठी अनेक पुरस्कार पटकावले. शाहरूख खानचे लाखो चाहते जगभरात आहेत. त्याच्या नव्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. असं असलं तरी बॉलिवूडचा सुपरस्टार वादापासून दूर राहू शकला नाही. या वादामुळे शाहरूख खान मीडियातील हेडलाइन्समध्ये राहीला.

1. 2006 मध्ये 'डॉन' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख खान त्याची सहकलाकार प्रियांका चोप्राला डेट करत असल्याची अफवा उडाली होती. या अफवेनंतर दोघांनी एकमेकांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. 2011 मध्ये 'डॉन 2' चित्रपटात हे दोघे शेवटचे एकत्र दिसले होते.

2. शाहरुख आणि सलमान यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. 2008 मध्ये अभिनेत्री कतरिना कैफच्या वाढदिवशी हा वाद झाला होता. त्यानंतर अनेक वर्षे दोघांमध्ये दुरावा राहिला. कालांतराने दोघं एकमेकांशी बोलू लागले. आर्यन खानला अटक झाल्यानंतर सलमान शाहरुख खानच्या घरीही गेला होता.

3. वानखेडे स्टेडियम आणि शाहरुख खान वाद सर्वानाच माहिती आहे. आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सनं विजय मिळवल्यानंतर मैदानात वाद झाला. सुहाना खान आणि तिच्या मैत्रिणींशी गैरवर्तन केल्याबद्दल सुरक्षा अधिकार्‍यांशी वादावादी झाली. यानंतर एमसीएनं अभिनेत्यावर स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी पाच वर्षांची बंदी घातली.

AishwaryaRai birthday: रात्री उशिरा ऐश्वर्याच्या घरी जाऊन सलमानचा हैदोस; नात्यात कायमचा दुरावा येण्यास 'तो' प्रसंग कारणीभूत

4. शाहरुख खानने देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर वादाची ठिणगी पडली होती. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं होतं. काही युजर्संनी देशात त्याचे चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

5. 2021 हे वर्ष शाहरुख खानसाठी अनलकी ठरलं असंच म्हणावं लागेल. 3 ऑक्टोबर 2021 या दिवशी मुलगा आर्यन खान याला NCB ने एका ड्रग्ज प्रकरणात अटक केली. त्यानंतर हा वाद महिनाभर चालला. कायदेशीर लढाई लढल्यानंतर 28 ऑक्टोबर 2021 रोजी आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Read More