Marathi News> मनोरंजन
Advertisement

Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता अभिनेत्री तिच्या लहाण बहिणीसोबत उभी आहे. तिने जीन्स पॅंट आणि टी शर्ट परीधान केले आहे आणि दोन वेन्या बांधल्या आहेत. या फोटोत ती खुप सुंदर दिसत आहे. 

Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे. 

फोटोत काय? 

फोटोत तुम्ही पाहू शकता अभिनेत्री तिच्या लहाण बहिणीसोबत उभी आहे. तिने जीन्स पॅंट आणि टी शर्ट परीधान केले आहे आणि दोन वेन्या बांधल्या आहेत. या फोटोत ती खुप सुंदर दिसत आहे. या फोटोतल्या अभिनेत्रीला तुम्हाला ओळखायचे आहे. 

फोटोतली अभिनेत्री मोठी होऊन आता बॉलिवूडची स्टार बनली आहे.ही अभिनेत्री एका सैनिकाची मुलगी आहे. या सोबतच या अभिनेत्रीने इरफान खान आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सोबत सिनेमात काम केले आहे. आता इतकी सगळी माहिती दिल्यावर तुम्हाला ही अभिनेत्री कोण आहे हे ओळखता आले असेलचं. जर तुम्ही अजूनही या अभिनेत्रीला ओळखू शकला नसाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो. 

फोटोतली ही स्टार बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौर (nimrat kaur) आहे. या अभिनेत्रीने लंचबॉक्स आणि एअरलिफ्ट सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. निम्रतचे वडील मेजर भूपेनार सिंग हे भारतीय सैन्यात होते. निम्रत अनेकदा वडिलांची आठवण करून जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान या फोटोत निम्रत तिची धाकटी बहीण रुबिना सिंग सोहीसोबत दिसत आहे. फोटोमध्ये निम्रत खूपच क्यूट आणि निरागस दिसत आहे. 

निम्रत कौरने (nimrat kaur) पहिल्यांदा कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या 'तेरा मेरा प्यार' या प्रसिद्ध गाण्यात दिसली होती. यानंतर निम्रतने अनेक मोठ्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. ती एशियन पेंट्स, काया स्किन क्लिनिक आणि कॅडबरी डेअरी मिल्कसह अनेक मोठ्या जाहीरातींमध्ये काम केले आहे. तसेच तिने इरफान खानसोबत लंचबॉक्स आणि अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) एअरलिफ्ट या बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे.

Read More