Marathi News> मनोरंजन
Advertisement

अडचणीत गेलं होतं गोविंदाचं बालपण, आर्थिक अडचणींमुळे सोडावं लागलं मुंबईतलं घर

गोविंदाचं बालपण अनेक अडचणीतून गेलं. 

अडचणीत गेलं होतं गोविंदाचं बालपण, आर्थिक अडचणींमुळे सोडावं लागलं मुंबईतलं घर

मुंबई : बॉलिवूडचा सदाबहार कॉमेडी हीरो गोविंदा 57 वर्षांचा झाला आहे. 21 डिसेंबर 1963 रोजी जन्मलेल्या गोविंदाचे वडील अरुण कुमार आहूजा एक चित्रपट निर्माते होते. गोविंदाने 1986 मध्ये 'इल्जाम'मधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून तो165हून अधिक चित्रपटांमध्ये दिसला आहे.

गोविंदाचं बालपण अनेक अडचणीतून गेलं. चित्रपट फ्लॉप होत असल्या कारणांमुळे त्याच्या वडिलांना आर्थिक त्रासाला सामोरं जावं लागलं. गोविंदाचे वडील आजारी राहू लागले आणि  कार्टर रोड बंगल्यातून त्याचं कुटुंब विरारमध्ये शिफ्ट झालं. जिथे गोविंदाचा जन्म झाला.

गोविंदा म्हणाला, 'मी खूप संघर्ष केला आहे. हे खूप कठिण होतं. जेव्हा मी संघर्ष करत होतो. तेव्हा लोकांनी माझ्या अडचणी वाढवल्या होत्या. मी ऐकलं होतं आणि पाहिलं होतं बच्चन सरांसोबत काय होत होते, मात्र हे माझ्या बाबतीतही घडेल याची मला कल्पना नव्हती. त्यांनी यावर मात केली, हे माझ्यासाठी प्रेरणादायी होतं.'

नीलमसोबत होतं अफेअर
गोविंदा आणि नीलमचं अफेअरही चर्चेत होतं. नीलम गोविंदाच्या 'इल्जाम' या पहिल्या चित्रपटाची हिरोईन होती. नंतर गोविंदाने सुनीताशी लग्न केलं. एका दिलेल्या मुलाखतीत गोविंदा म्हणाला- 'मी सुनीताला म्हणायचो की स्वतःला बदल आणि नीलमसारखं हो'.

fallbacks

गोविंदाच्या म्हणण्यानुसार, 'मी सुनिताला म्हणायचो नीलमकडून शिक. यावर बर्‍याचदा सुनिता माझ्यावर रागावायची. ती मला म्हणाली की, मी जशी आहे तशी राहाणार माझ्यावर तसंच प्रेम कर. मी कन्फ्यूज होतो. मला कळत नव्हतं मी काय करावं ते.'

राणी मुखर्जीसोबत जोडंलं होतं नाव
राणी आणि गोविंदाने 'हद कर दी अपना', 'प्यार दीवाना होता है' आणि 'चलो इश्क लडाये' अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. यावेळी राणी आणि गोविंदा एकमेकांच्या खूप जवळ आले होते. मात्र या दोघांनीही आपलं नातं कधीच स्वीकारलं नाही.

एका वृत्तानुसार गोविंदाची पत्नी सुनीताला याबद्दलची माहिती मिळताच ती खूप चिडली होती. यामुळे ईतका वाद निर्माण झाला होता. की, सुनिताने मुलांसह गोविंदाचे घर सोडलं. यानंत गोविंदा आणि राणी कायमचे वेगळे झाले.

Read More