Marathi News> मनोरंजन
Advertisement

क्रांती रेडकरने दिली ही 'गुड न्यूज'

काही दिवसांपूर्वीच ओटभरणीची केले होते फोटो शेअर 

क्रांती रेडकरने दिली ही 'गुड न्यूज'

मुंबई : बॉलिवूडमध्ये जसा उत्साहाचा जल्लोष सुरू आहे तशाच आनंदाच सेलिब्रेशन हे मराठी सिनेसृष्टीतही सुरू आहे. अभिनेता अनिकेत विश्वासराव देखील डिसेंबरमध्ये लग्न करणार असून आणखी एक गोड बातमी समोर आली आहे. एका अभिनेत्रींना गोंडस जुळ्यांना जन्म दिला आहे. 

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. मुंबईच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये क्रांतीने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. क्रांतीवर आता कुटुंबिय आणि मराठी सिनेसृष्टीकडून आनंदाचा वर्षाव होत आहे. 

 क्रांतीने २०१७ साली आयआरएस अधिकारी समीर वानखेडेशी लग्न केलं. या दोघांनीही अगदी साध्या आणि गुपचूप पद्धतीने लग्न केलं होतं. अद्याप क्रांतीने आपल्या नवऱ्यासोबत एकही फोटो शेअर केलेला नाही. 

 काही दिवसापूर्वीच तिच्या घरी डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी तिने या सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर केले होते. यामधील एका फोटोत क्रांती नाकात नथ घालून, कपाळाला कुकूं लावून दिसत होती. 

'जत्रा' सिनेमातील 'कोंबडी पळाली' हे गाणं खूप गाजलं आणि या गाण्यानंच क्रांतीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर तिनं 'ऑन ड्यूटी २४ तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे', या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली. याशिवाय क्रांतीनं 'काकण' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

Read More