Marathi News> मनोरंजन
Advertisement

सासरच्या या गोष्टीमुळे जेनेलिया वैतागली, संतापून रितेशला म्हणाली...

रितेशला धक्का बसला 

सासरच्या या गोष्टीमुळे जेनेलिया वैतागली, संतापून रितेशला म्हणाली...

मुंबई : 'लेडीज व्हर्सेस जेंटलमेन' या शोच्या सीजन 2 मध्ये, जेनेलिया डिसूझाने खुलासा केला की, जेव्हा तिने रितेश देशमुखशी लग्न केले तेव्हा ती दररोज सकाळी तयार व्हायची.

मात्र, तिला या कामाचा लवकरच कंटाळा आला आणि एक महिन्यानंतर ती म्हणाली, 'मी हे करू शकत नाही.' अभिनेत्रीने सांगितले की, तिला रोज सकाळी उठून सजण्याचा आणि तयार होण्याचा कंटाळा येत होता.

जेनेलियाला दररोज सजण्याचा आणि तयार होणं कंटाळवाणं वाटत होतं. जेनेलिया म्हणते, 'जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मला वाटले, आता सगळं काही छान झालं आहे. मात्र मला रोज सकाळी तयार व्हावं लागत होतं. ज्यामुळे माझी चिडचिड व्हायची.

रितेश म्हणतो की, तो बॉक्सर आणि टी-शर्ट घालून जेवणाच्या टेबलवर बसेल, तर जेनेलिया रोज ड्रेस आणि दागिने परिधान करेल.

जेनेलिया पुढे म्हणते, 'मला वाटायचं असं सकाळी नटावं लागतं, तयार व्हावं लागतं, म्हणजे पूजा वैगेरे काही असेल, जे मला माहित नाही. अभिनेत्री एक महिना रोज तयार व्हायची आणि शेवटी एके दिवशी तिला या सगळ्याचा कंटाळा आला. अभिनेत्रीने रितेशला सांगितले, 'मी हे आता करू शकत नाही.' रितेशला धक्का बसला आणि तो गोंधळात पडला.

जेनेलिया आणि रितेशची जोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी आहे. दोघांची केमिस्ट्री बऱ्याचदा सोहळ्यांमध्ये पाहायला मिळते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रितेश आणि जेनेलियाची पहिली भेट  

जेनेलियाने स्पष्ट केले की, ती दररोज असे कपडे घालू शकत नाही. रितेश म्हणाला, 'मी स्वत: विचार करत होतो की तू रोज असे कपडे का घालतेस!' रितेश आणि जेनेलिया 'तुझे मेरी कसम'च्या शूटिंगदरम्यान भेटले होते.

 

Read More