Marathi News> मनोरंजन
Advertisement

Riteish Deshmukh च्या पत्नीला डॉक्टरांकडून एक महिना आराम करण्याचा सल्ला; चाहते चिंतेत

या डॉक्टरांचा सल्ला पाहता Riteish नं मात्र दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला

Riteish Deshmukh च्या पत्नीला डॉक्टरांकडून एक महिना आराम करण्याचा सल्ला; चाहते चिंतेत

मुंबई : सेलिब्रिटी वर्तुळात काही चेहऱ्यांना आणि काही नावांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतं. हिंदी आणि मराठी कलाजगतामध्ये अशी प्रसिद्धी आणि प्रेम मिळवणारी एक जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनीलिया डिसूझा (Genelia DSouza Riteish Deshmukh). जेनी आणि रितेशच्या रिलेशनशिपपासून त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास, नंतर मैत्रीपासून वैवाहिक आयुष्यापर्यंत आलेलं त्यांचं नातं आणि आता दोन मुलांची जबाबदारी घेत आयुष्याचा मनमुराद आनंद घेणारी ही जोडी बहुविध कारणांनी लक्ष वेधते. 

मुलांना दिलेली शिकवण असो किंवा मग धमाल Reels शेअर करत चाहत्यांना Entertain करणं असो, रितेश आणि जिनीलियानं नेहमीच नवा पायंडा पाडला आहे. आतासुद्धा त्यांचा एक असा Video समोर आला आहे, ज्यामुळं फॉलोअर्स आणि चाहते तो वारंवार पाहत आहेत. 

वाचा : मागचापुढचा विचार न करता, अभिनेत्रीसाठी रणबीरनं सोडलं राहतं घर; ऐकून आलियालाही बसेल धक्का

 

व्हिडीओमध्ये म्हणे जिनीलियाला डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. पण, या डॉक्टरांचा (Doctor Consultation) सल्ला पाहता रितेशनं मात्र दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. जेनीला नेमकं झालंय काय? तुम्हीही चिंतेत पडलात ना? 

चिंता नसावी.... 
जिनीलियाला डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलाय खरा, पण हे सर्व एका Instagram Reel मध्ये घडत आहे. प्रत्यक्षात त्याचा काही संबंध नाही. Genelia नं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती रितेशला म्हणताना दिसते, "सुनो जी डॉक्टर ने मुझे एक महीना आराम करने को बोला है स्वित्झर्लंड, पॅरिस, अमेरिका, लंडन, यूएसए. आप मुझे कहां लेके जाओगे?"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

तिचा हा प्रश्न ऐकून रितेश आधी हैराण होतो आणि मग उत्तर देतो, "दूसरे डॉक्टर के पास". आनंदी राहा, आयुष्य मनमुराद जगा... असं कॅप्शन रितेशच्या पत्नीनं या व्हिडीओला दिलं आहे. त्यांचा हा Reel सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. 

 

Read More