Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेता पत्नीला पाण्याखाली घेऊन गेला आणि त्यानंतर जे घडलं... व्हिडिओ तुफान व्हायरल

अनेकांनी दोघांच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

 अभिनेता पत्नीला पाण्याखाली घेऊन गेला आणि त्यानंतर जे घडलं... व्हिडिओ तुफान व्हायरल

मुंबई :  'अनुपमा' फेम अभिनेता गौरव खन्ना चाहत्यांमध्ये सध्या अनुज कपाडिया म्हणून ओळखला जात आहे.गौरव आणि रुपाली गांगुली यांची ऑन स्क्रिन जोडी खूप गाजली आहे आणि गेल्या 1 वर्षापासून टीआरपीमध्ये सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने लवकरच या मालिकेत दोघांमध्ये रोमान्स पाहायला मिळणार आहे, पण त्याआधी खऱ्या आयुष्यात अनुज म्हणजेच गौरव खन्ना याचा रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे. 

गौरवने व्हॅलेंटाईन डेच्या आधी पत्नी आणि अभिनेत्री आकांशा खन्नासोबत लिपलॉक करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. दोघेही अंडरवॉटर एकमेकांना किस करताना दिसत आहेत. गौरव खन्ना आणि आकांशा खन्ना यांचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.

गौरवचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियाचे तापमान वाढवत आहे. गौरव खन्नाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंडरवॉटर रोमान्स करताना कपल लिप लॉक करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, 'क्यूट कपल. अनेकांनी दोघांच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

Read More