Marathi News> मनोरंजन
Advertisement

PHOTO : स्वातंत्र्य दिनाला 'मणिकर्णिका'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित

अतुल कुलकर्णी, सोनू सुद आणि अंकिता लोखंडेही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत

PHOTO : स्वातंत्र्य दिनाला 'मणिकर्णिका'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित

मुंबई : स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधुन कंगना रानोटच्या बहुचर्चित 'मणिकर्णिका- द क्विन ऑफ झांसी' या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. हा बहुचर्चित चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित केला जाणारय. या चित्रपटात कंगनानं झाशीच्या राणीची भूमिका साकारलीय. क्रिश यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. पाठीवर तान्हुल्याला घेऊन रणांगणात उतरणाऱ्या झाशीच्या राणीचं हे पोस्टर आहे.

fallbacks
मणिकर्णिकाचं पहिलं पोस्टर

 

चित्रपटात अतुल कुलकर्णी, सोनू सुद आणि अंकिता लोखंडेही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अंकिता लोखंडे या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. 

झाशीच्या राणीची विश्वासू सहकारी झलकारीबाईच्या भूमिकेत अंकिता आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे.

Read More