Marathi News> मनोरंजन
Advertisement

रेमो डिसूजाचा ऑपरेशननंतर पहिला फोटो आला समोर, आमीर अलीने शेअर केला फोटो

शुक्रवारी रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका आला होता. 

रेमो डिसूजाचा ऑपरेशननंतर पहिला फोटो आला समोर, आमीर अलीने शेअर केला फोटो

मुंबई : बॉलिवूडचा प्रख्यात नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा याला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. देशभरातून कलाकार आणि त्याचे चाहते सोशल मीडियावर रेमोच्या आरोग्य सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहेत. नुकतीच रेमोवर हृदय शस्त्रक्रिया झाली. पण आता रेमोच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी अशी आहे की त्याची प्रकृती आता उत्तम दिसत आहे. अलीकडेच त्याची पत्नी लिजेल डिसूजाने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो म्यूझिकवर पायांची हालचाल करताना दिसत होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aamir Ali (@aamirali)

रेमोचा जवळचा मित्र आमिर अली यांने रेमो डिसोजाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याचा पूर्ण चेहरा दिसत नसला तरी त्याने दिलेली पोज बरंच काही सांगत आहे. त्याची प्रकृती उत्तम असल्याचं यामधून तो सांगत आहे.

संबंधित बातमीहार्ट सर्जरीनंतर रेमो डिसूजाचा रुग्णालयातील हा डान्स व्हिडिओ व्हायरल

शुक्रवारी रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केले गेले. रेमा डीआयडी शोनंतर त्याने बनवलेल्या अनेक सुपरहिट सिनेमांमधून प्रसिद्धीस आला होता.

Read More