Marathi News> मनोरंजन
Advertisement

राजकुमार राव आणि कंगना राणावत पुन्हा एकत्र

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर धमाका उडवून देण्यासाठी येत आहेत.

राजकुमार राव आणि कंगना राणावत पुन्हा एकत्र

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर धमाका उडवून देण्यासाठी येत आहेत.

दिग्दर्शक विकास बहल यांनी या जोडीला आधी एकत्र आणलं होतं. दोघेही पहिल्यांदा ‘क्वीन’मध्ये एकत्र दिसले होते. आता हे दोघेही ‘मेंटल है क्या’ सिनेमात एकत्र येणार आहेत. या सिनेमाची निर्मिती एकता कपूर करत आहे. 

प्रॉडक्शन हाऊसकडून या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. दोन पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. यात एका पोस्टरमध्ये कंगना राणावत आणि दुस-या पोस्टरमध्ये राजकुमार राव आहे. दोघांच्याही हावभावावरून सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. या सिनेमाची कथा कनिका ढिल्लन यांनी लिहिली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रकाश कोलेवमूडी करणार आहे. 

‘मेंटल है क्या’ हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमा असून कंगना राणावत आणि राजकुमार राव दोघेही या सिनेमात वेगळ्या अंदाजात बघायला मिळणार आहे. 

Read More