Marathi News> मनोरंजन
Advertisement

"आधी ऋषभ पंत साजरा कर,  मग दिवाळी.. "  उर्वशी रौतेलाला कोणाकडून मिळाला सल्ला

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. 

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. असं मानलं जातं आहे की, अभिनेत्री क्रिकेटरच्या प्रेमात आहे. यामुळे जेव्हाही उर्वशी सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करते तेव्हा ती पंतशी जोडली जाते. पुन्हा एकदा असंच काहीसं घडलं आहे आणि लोकांनी उर्वशीला दिवाळीऐवजी पंत साजरी करण्याचा सल्ला दिला.

उर्वशी रौतेलाने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आधी नाचताना आणि नंतर नेमबाजी करताना दिसत आहे. उर्वशीने हा व्हिडिओ शेअर करताच नेहमीप्रमाणे तिची पोस्टही व्हायरल झाली.

असा सवाल अभिनेत्रीने केला
हा व्हिडिओ शेअर करत उर्वशीने चाहत्यांकडून यावेळी दिवाळी ऑस्ट्रेलियात साजरी करायची की भारतात, असा सल्ला मागितला. उर्वशीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड गाजला असून कमेंट सेक्शनमध्ये ऋषभ पंतच्या नावाचा पूर आला आहे.

आधी पंत मग दिवाळी साजरी करा
उर्वशी रौतेलाच्या या व्हिडीओवर सोशल मीडिया यूजर्स खूप फनी-फनी प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने कमेंट करत लिहिलं आहे की, "खूप आनंदी आहे, असं दिसतं की, ऋषभ पंत अनब्लॉक झाला आहे." दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिलं की, "पंतभाईंना आधी पटवा आणि मग दिवाळी साजरी करा." त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, ''हाय रे दीवानगी, मान जो ऋषभ भाई.' " इतकंच नाही तर एका यूजरने तर 'ऋषभ जिथे जाईल, तिथेच तुमची दिवाळी साजरी होईल' असं लिहिलं आहे.

Read More