Marathi News> मनोरंजन
Advertisement

बागी २ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित...

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा सिनेमा बागी २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला.

बागी २ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित...

नवी दिल्ली : टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा सिनेमा बागी २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफची अॅक्शन पाहायला मिळत आहे. तर दिशा पटानीचा नाजूक, निष्पाण अंदाज पाहायला मिळत आहे. या सिनेमात मनोज वाजपेयी, दीपक डोबरियाल आणि रणदीप हु्ड्डा यांसारखे कलाकार दिसणार आहेत. ट्रेलर प्रदर्शनापूर्वी सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. ज्यात टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीचा जबरदस्त अंदाज दिसत आहे.

अनोख्या शैलीत ट्रेलर पदर्शित

बागी २ च्या निर्मात्यांनी सिनेमाचे ट्रेलर मुंबईच्या रेसकोर्सवर काही अनोख्या शैलीत पदर्शित केले. मुंबईच्या रेसकोर्सवर टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी ही सिनेमातील जोडी हेलीकॉप्टरने उतरली.

पहा बागी २ चा ट्रेलर...

 

बागी ३ ची घोषणा

अॅक्शन सीन्सने भरभरून असलेला हा सिनेमा एका महत्त्वाचे दृश्य हेलीकॉप्टरवर चित्रीत करण्यात आले आहे.२०१६ मध्ये आलेल्या बागी मध्ये टायगर श्रॉफसोबत श्रद्धा कपूर झळकली होती. सिनेमाच्या निर्मात्यांनी बागी २ प्रदर्शित होण्यापूर्वी बागी ३ चा देखील घोषणा केली.सिनेमाचे शूटींग डिसेंबर २०१८ मध्ये सुरू करणार असल्याचेही सांगितले. बागी २ हा सिनेमा ३० मार्च २०१८ मध्ये प्रदर्शित होईल. 

Read More