Marathi News> मनोरंजन
Advertisement

बागी २ मेकिंग व्हिडिओ शेअर ; टायगरचा अॅक्शन किंग अवतार

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या बागी २ चा ट्रेलर लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला. 

बागी २ मेकिंग व्हिडिओ शेअर ; टायगरचा अॅक्शन किंग अवतार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या बागी २ चा ट्रेलर लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला. सिनेमाची गाणी ही प्रेक्षकांना भावली. आता या सिनेमाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. याच दरम्यान निर्मात्यांनी सिनेमाचा मेकींग व्हिडिओ शेअर केला आहे. यात टायगरचा अॅक्शनपॅक पाहायला मिळतो. 

 मेकींग व्हिडिओ

ही अॅक्शन स्क्रीनवर साकारण्यासाठी टायगरने घेतलेली मेहनत मेकींग व्हिडिओमधून पाहायला मिळते. यातील स्टंट्स खुद्द टायगरने केले आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक अहमद खान यांनीही टायगरला चांगले मार्गदर्शन केले. तर टायगरनेही आपल्या प्रयत्नांची शर्त लढवली आहे. पहा व्हिडिओ...

टायगरची मेहनत

या सिनेमाबद्दल टायगर म्हणाला की, सिनेमात अॅक्शन करणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आणि कठीण होते. अॅक्शन साकारताना प्रत्येक वेळेस बॉडी थंड तर कधी गरम करावी लागत होती. 

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

सिनेमात टायगरसोबत दिशा पटानी प्रमुख भूमिकेत असून सिनेमा ३० मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Read More