Marathi News> मनोरंजन
Advertisement

'3 स्टोरीज' सिनेमाचे इंटरेस्टींग पोस्टर प्रदर्शित...

अर्जुन मुखर्जीच्या '3 स्टोरीज' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

'3 स्टोरीज' सिनेमाचे इंटरेस्टींग पोस्टर प्रदर्शित...

मुंबई : अर्जुन मुखर्जीच्या '3 स्टोरीज' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करताना तरणने त्याला खास कॅप्शनही दिली आहे. तरण म्हणतो, ‘Check out the eye-catching posters of  #3Storeys’

काय आहे खासियत?

हे पोस्टर अत्यंत इंटरेस्टिंग आहे. ते तुम्हाला फार बारकाईने बघायला हवे. कारण हे लक्षवेधी पोस्टर ३ डी इफेक्टसह तयार करण्यात आले आहे. मात्र ते समजण्यासाठी थोडी मेहनत तर तुम्हाला घ्यावी लागेल. या पोस्टरमध्ये चेहरा लपला आहे. फोटो उलटा करुन बघितल्यास तुम्हाला त्यात पुलकीत सम्राट, रेणूका शहाणे आणि शर्मन जोशी यांचे चेहरे आळीपाळीने दिसतील. 

लवकरच होणार प्रदर्शित

थ्रील, रोमान्स, प्रेम, गूढता या विविध पैलूंनी युक्त अशी सिनेमाची कथा आहे. ९ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात रेणूका शहाणे एका खास व्यक्तिरेखेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Read More