Marathi News> मनोरंजन
Advertisement

Rajinikanth On Kavya Maran: 'मला काव्याचा दु:खी चेहरा पाहवत नाही', SRH च्या मालकीणीवर सुपरस्टार रजनीकांत स्पष्टच बोलले!

Superstar Rajinikanth News:  काव्या मारनला (Kavya Maran) आयपीएल सामन्यांदरम्यान टीव्हीवर इतकं उदास पाहणं मला आवडत नाही, असं रजनीकांत (Rajinikanth) म्हणाले आहेत.

Rajinikanth On Kavya Maran: 'मला काव्याचा दु:खी चेहरा पाहवत नाही', SRH च्या मालकीणीवर सुपरस्टार रजनीकांत स्पष्टच बोलले!

Rajinikanth On Kavya Maran: इंडियन प्रिमियर लीगची (IPL) भारतातच नव्हे तर जगभरात चर्चे असते. गेल्या काही वर्षात हैदराबादला (Sunrisers Hyderabad) आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. 2016 नंतर हैदराबाद संघाला मोठं यश मिळालं नसल्याने एसआरएचचे फॅन्स निराश आहेत. हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचे मालक कलानिधी मारन (Kalanithi Maran) यांची मुलगी काव्या मारन (Kavya Maran) नेहमी संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात हजर असते. मात्र, सामन्यात पराभव झाल्यानंतर तिचा चेहरा पडलेला दिसतो. अशातच आता सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी मोठं वक्तव्य केलंय. रजनीकांतच्या वक्तव्यावर आता चर्चा होताना दिसत आहे.

नेमकं काय म्हणाले Rajinikanth ?

टीव्हीवर काव्या मारनचा (Kavya Maran) निराश चेहरा पाहणं माझ्यासाठी आनंददायी नाही. काव्या मारनचे वडील कलानिथी मारन  (Kalanithi Maran) यांनी सनरायझर्स हैदराबाद संघात चांगल्या खेळाडूंचा समावेश करावा, असं रजनीकांतने जेलर ऑडिओ लॉन्च प्रसंगी सांगितलं. काव्या मारनला आयपीएल सामन्यांदरम्यान टीव्हीवर इतकं उदास पाहणं मला आवडत नाही, असं रजनीकांत म्हणाले आहेत.

रजनीकांत देखील हैदराबादच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये दिसून आले आहेत. 2016 साली हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून दणक्यात आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी डेव्हिड वॉर्नर संघाचं नेतृत्व करत होता. मात्र, 2016 नंतर संघाचा परफॉर्मन्स सात्त्याने खाली गेल्याचं पहायला मिळतंय. हैदराबादने डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, राशिद खान आणि जॉनी बेअरस्टो यांसारख्या स्टार खेळाडूंना संघाबाहेर केल्यानंतर त्यांना गेमचेंजर खेळाडू मिळाला नाही.

आणखी वाचा - Bhuvneshwar Kumar: टीम इंडियाच्या 'स्विंग बादशाह'ने उडवली खळबळ; कॅप्टन रोहित शर्माचं टेन्शन वाढलं!

दरम्यान, मागील आयपीएल हंगामात खेळलेल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने निराशाजनक कामगिरी केली. मागील हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाला 14 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले. त्यामुळे त्यांना प्लेऑफ देखील गाठता आलं नाही. त्याचबरोबर मागील 3 हंगामात संघाला क्वालिफाय करता आलं नाही.

Read More