Marathi News> मनोरंजन
Advertisement

वडिलांचा मेसेज ऐकून सेटवरच रडला सलमान खान...

बॉलिवूडचा दंबग खान सलमान सध्या रेस ३ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

वडिलांचा मेसेज ऐकून सेटवरच रडला सलमान खान...

मुंबई : बॉलिवूडचा दंबग खान सलमान सध्या रेस ३ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर त्याचा टी.व्ही शो दस का दम ही चांगलाच चर्चेत आहे. या गेममधील सलमान आणि त्याच्या चाहत्यांमधील बॉण्डींगचे खूप कौतुक होत आहे. तब्बल १० वर्षांनंतर सलमान पुन्हा एकदा हा शो होस्ट करत आहे. सलमानचा नटखट अंदाज शो मध्येही दिसतो आणि तो लोकप्रियही ठरत आहे. पण जेव्हा सलमान भावूक होतो तेव्हा.... 

त्याचे झाले असे. दस का दमच्या निर्मात्यांनी सलीम खान यांना मुलगा सलमानसाठी काहीतरी खास मेसेज देण्याची विनंती केली. सलीम खान यांनी सलमानसाठी खास मेसेजही दिला. दस का दमच्या सेटवर जेव्हा या मेसेजचा व्हिडिओ प्ले करण्यात आला तेव्हा मात्र सलमानच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

सलीम खान म्हणाले...

व्हिडिओत सलीम खान म्हणतात की, ''बाप आणि मुलाचे नाते कोणीही शब्दात मांडू शकत नाही. मी फक्त सलमानला हाच आशीर्वाद देईन की, परमेश्वराने त्याला सन्मान आणि आरोग्य द्यावे. बाकी पैसे आम्ही स्वतः कमवू.'' वडीलांचा हा मेसेज ऐकून सलमान सेटवर भावूक झाला. पहा दस का दम या शो चा हा व्हिडिओ...

जीवे मारण्याच्या धमकीमुळे चिंता कायम

अलिकडेच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. याप्रकरणी हरियाणा पोलीसांनी संपत नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. सलमानला घरात मारण्याचे त्याचे प्लॅनिंग असल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला. 

सलमान खानचे वडील सलीम खान यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. त्याचे उत्तम बॉडीगार्ड्स त्याच्या सुरक्षिततेसाठी उपस्थित आहेत. तरी देखील आम्हाला त्याची चिंता कायम असते. 

 

Read More