Marathi News> मनोरंजन
Advertisement

Boyfriend च्या छळाने कोलमडलेली 'ही' सेलिब्रिटी; जाहीरपणे म्हणाली, तो मला...

तो मला अशी वागणूक देत होता की ... 

Boyfriend च्या छळाने कोलमडलेली 'ही' सेलिब्रिटी; जाहीरपणे म्हणाली, तो मला...

मुंबई : अनेकदा काही व्यक्ती नात्यांच्या मर्यादा इतक्या गंभीर पातळीपर्यंत ओलांडतात, की या नात्याला नेमकं काय नाव द्यावं असाच प्रश्न वारंवार उभा राहतो. हा प्रश्न उदभवतोय कारण, एका लोकप्रिय फॅशन डिझायनरला अतिशय हीन दर्याजी वागणून मिळाली आहे, तेसुद्धा एका अशा व्यक्तीकडून ज्याच्यावर तिनं जिवापाड प्रेम केलं. (Saisha Shinde)

ही सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे, साईशा शिंदे. एरा रिअॅलिटी शोमध्ये साईशानं तिच्यासोबत घडलेला प्रकार सर्वांसमोर उघड केला. 

मीसुद्धा शोषणाची बळी आहे, हे शारीरिक नव्हे, तर हे मानसिक शोषण होतं, असं साईशा म्हणाली. 

'तो मला अशी वागणूक देत होता की माझी काही किंमतच नव्हती. तो सतत माझ्यावर संशय करत होता. तो दाराबाहेर उभं राहून वाट पाहायचा की मला कोणी भेटायला येईल आणि तो मला पकडू शकेल. 

घराच्या छतावर यायचा, पाईपलाईननं बाथरूनमध्ये वाकून पाहायचा, मी कधीच या नात्यामध्ये आनंदात नव्हते. मला आश्चर्य वाटतं की तेव्हा मला हे सगळं का कळत नव्हतं?', असं साईशा म्हणाली. 

साईशा एक ट्रान्सवुमन आहे. तिनं आपल्या या अस्तित्वाबद्दलही कार्यक्रमात वाच्यता केली. पहिल्या तीन मनोविकारतज्ज्ञांनी शस्त्रक्रियेसाठी आपल्याला स्पष्ट नकार दिल्याचं तिनं सांगितलं. 

पिळदार शरीरयष्टी आणि देखणं रुप असल्यामुळं ते नकार देत होते. यापूर्वी साईशाची ओळख स्वप्नील शिंदे अशी होती. ज्यानंतर आपलं पूर्वायुष्य विसरत त्यानं साईशा शिंदे अशी एक नवी ओळख तयार केली आणि ट्रान्सवुमन म्हणून ती अभिमानानं जगू लागली. 

Read More