Marathi News> मनोरंजन
Advertisement

मसाबाच्या बोल्ड लूकपुढे भल्याभल्या सेलिब्रिटीही 'क्लीन बोल्ड'

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिनं मॉडेलिंगमध्येही तिचं नशीब आजमावून पाहिलं

मसाबाच्या बोल्ड लूकपुढे भल्याभल्या सेलिब्रिटीही 'क्लीन बोल्ड'

मुंबई : फॅशन डिझायनिंग विश्वामध्ये नाव कमवल्यानंतर सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता (masaba gupta) हिनं मॉडेलिंगमध्येही तिचं नशीब आजमावून पाहिलं. सब्यसाची मुखर्जीच्या ब्रायडल कलेक्शनसाठी मसाबानं मॉडेलिंग केलं आणि तिच्या या अंदाजावर सारेच घायाळ झाले. 

वेब सीरिजच्या वर्तुळातही मसाबानं दमदार कामगिरी केली. तिथे आई, (Neena Gupta) नीना गुप्तासोबतची तिची केमिस्ट्री म्हणजे मॉडर्न आई- मुलीच्या नात्याचा आदर्शच ठरत आहे. अशी चहुबाजुंनी प्रशंसा होत असतानाच मसाबानं आता पुन्हा एकदा दमदार अंदाजात नेटकरी आणि बी- टाऊनमधील इतर सेलिब्रिटींना घायाळ केलं आहे. 

नुकतंच मसाबानं तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले, यामध्ये तिच्यामध्ये झालेला बदल अगदी स्पष्टपणे दिसत आहे. त्वचेच्या रंगाशी मिळताजुळता पेहराव, गव्हाळ वर्णाला साजेसा मेकअप आणि त्यावर उठून दिसणारी ज्वेलरी आणि अतिशय आत्मविश्वासानं कॅमेरामध्ये रोखलेली तिची नजर म्हणजे क्या बात. 

fallbacks

fallbacks

मलायका अरोरा, ताहिरा कश्यप, समंथा अक्किनेनी आणि इतरही सेलिब्रिटींनी तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनचं तोंड भरुन कौतुक केलं. मसाबाचा हा अंदाज पाहता ती इतर मॉडेल आणि अभिनेत्रींनाही टक्कर देईल यात शंकाच नाही. किंबहुना मजेशीर अंदाजात सांगावं तर, मसाबाच्या या लूकमुळं अनेक सौंदर्यवतींनी धस्काच घेतला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

Read More