Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्न हवं, पण पतीचं नाव नको, फरहानच्या पत्नीने का घेतला हा निर्णय?

पण अभिनेत्रीला ते काही विशेष आवडलं नाही असे बोललं जात आहे.

 लग्न हवं, पण पतीचं नाव नको, फरहानच्या पत्नीने का घेतला हा निर्णय?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा 19 फेब्रुवारीला विवाहसोहळा पार पडला. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरच्या लग्नाच्या फोटोंनीही इंटरनेटवर एकच धुमाकूळ घातला.

त्यांचे फोटो खूपच व्हायरल झाले होते. फरहान आणि शिबानी या दोघांनीही त्यांच्या खास दिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले..

शिबानीने लग्नानंतर लगेचच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या बायो बदलला आणि त्यात 'मिसेस अख्तर' असं लिहिलं, पण अभिनेत्रीला ते काही विशेष आवडलं नाही असे बोललं जात आहे.

शिबानी दांडेकर अख्तरने लग्नानंतर काही दिवसांनी मिसेस अख्तर हे टेक्स्ट तिच्या इंस्टाग्राम बायोमधून काढून टाकलं आहे.

 शिबानी दांडेकरने लग्नानंतर तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर शिबानी दांडेकर-अख्तर असं नाव ठेवलं होतं, तसंच बायोमध्ये निर्माती, अभिनेत्री, गायिका आणि मिसेस अख्तर असं देखील लिहिलं होतं.

fallbacks

आता शिबानी दांडेकर इंस्टाग्रामने पुन्हा एकदा तिचा इंस्टाग्राम बायोमध्ये बदल केला आहे. त्यामुळे ती चर्चेत  आली आहे शिबानी दांडेकरचा बायो एडिट करण्यामागचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.


 

Read More