Marathi News> मनोरंजन
Advertisement

Farhan Akhtar दुसऱ्या लग्नासाठी तयार, वडिलांनी सांगितली लग्नाची तारीख

फरहान अख्तर गर्लफ्रेंडसोबत अडकणार लग्न बंधनात...  

Farhan Akhtar दुसऱ्या लग्नासाठी तयार, वडिलांनी सांगितली लग्नाची तारीख

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पार्टनरसोबत लग्न केलं आहे. आता अभिनेता आणि गायक फरहान अख्तर देखील लग्न बंधनात अडकणार आहे. फरहानच्या दुसऱ्या लग्नाची माहिती फरहानचे वडील ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी दिली आहे. फरहान अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत नव्या आयुष्याला सुरूवात करणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी 21 फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहे. बॉम्बे टाईम्सशी बोलताना जावेद अख्तर यांनी मुलगा फरहानच्या लग्नाबद्दल माहिती दिला आहे. जावेद अख्तर म्हणाले- 'लग्न होत आहे. लग्नाची तयारी सुरू आहे...'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ते पुढे म्हणाले, 'कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता थोडक्यात लग्न सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे कमी लोकांना आमंत्रित करत आहोत...' एवढंच नाही तर त्यांनी यावेळी शिबानीचं देखील कौतुक केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिबानी आणि फरहान बद्दल सांगायचं झालं तर, दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. शिवाय सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात. 

Read More