Marathi News> मनोरंजन
Advertisement

'त्यांचा राग आणि...', पूर्वाश्रमीच्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मुलींसाठी स्वत: ला दोषी समजायचा फरहान अख्तर

Farhan on Divorce Affecting Daughters : फरहान अख्तरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

'त्यांचा राग आणि...', पूर्वाश्रमीच्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मुलींसाठी स्वत: ला दोषी समजायचा फरहान अख्तर

Farhan on Divorce Affecting Daughters : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर त्याच्या कामापेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. फरहान सध्या अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत त्याचं वैवाहिक आयुष्य आनंदानं जगत आहे. पण तिच्या आधी फरहाननं 2000 मध्ये अधुना भबानीशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. फरहान आणि अधुना यांना दोन मुली असून शाक्य आणि अकीरा अशी त्यांची नावं आहेत. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फरहाननं त्याच्या दोन्ही मुली शाक्या आणि अकीरासाठी स्वत: ला दोषी ठरवलं. त्याचं कारण म्हणजे त्याचा आणि अधुनाचा घटस्फोट असं त्यानं सांगितलं. 

फरहान अख्तरनं नुकतीच रिया चक्रवर्तीच्या 'पॉडकास्ट चॅप्टर 2' मध्ये हजेरी लावली होती. या दरम्यान, रियानं फरहानशी अनेक खासगी आयुष्यासंबंधीत प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देताना फरहान काचकूच करत होता. रिया चक्रवर्तीनं फरहानला विचारलं की 'त्याचे आई-वडील जावेद अख्तर आणि त्याची आई हनी ईरानीनं घटस्फोट घेतल्यानंतर त्याच्यावर या सगळ्याचा कसा परिणाम झाला होता.' त्यानंतर त्यानं या सगळ्याचा संबंध हा लेक शाक्य आणि अकीरानं त्याच्या आणि अधुनाच्या घटस्फोटावर स्वत: ला कसं सांभाळलं आणि त्याच्यासाठी हे कठीण होतं का? 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रिया चक्रवर्तीच्या प्रश्नावर फरहाननं सांगितलं की 'शाक्य आणि अकीरासाठी हे काही सोपं नव्हतं. कारण त्यांचं म्हणणं होतं की अधुनासोबत त्याचं नात खूप चांगलं होतं आणि त्यानंतर त्यांचं नातं तुटलं. पुढे त्यांच्या घटस्फोटावर दोन्ही मुली किती रागावल्या आणि नाराज होत्या का की असं का झालं? फरहाननं देखील हे सांगितलं की जसा काळ गेला तशी त्यांना सांत्वन मिळाली.' 

हेही वाचा : 'कोणाच्या भावना दुखावण्याची...', पंजाबी गायक गुदरास माननं कान पकडून मागितली माफी

फरहान अख्तरनं याविषयी सांगितलं की जेव्हा अधुना आणि माझा घटस्फोट झाला तेव्हा मी माझ्या दोन्ही मुलींसाठी स्वत: ला दोषी ठरवत होतो, कारण त्याचा आणि याचा घेणं देणं नसतं. त्यामुळे भावनिकदृष्ट्या हे खूप दुखावणारं होतं. दरम्यान, फरहानसोबत त्याची पत्नी शिबानी दांडेकर देखील पोहोचली होती. 

Read More