Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नाच्या 18 वर्षानंतर 'हे' कपल घेणार घटस्फोट?

या कपलचं लग्न हे 18 वर्षांपूर्वी झालेल्या त्यांच्या आलिशान लग्नामुळे चर्चेत आलं होतं. त्यांना दोन मुलं असून एक मुलगा एक मुलगी आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीवर त्यांनी काही प्रतिक्रिया देखील दिली नाही. 

लग्नाच्या 18 वर्षानंतर 'हे' कपल घेणार घटस्फोट?

Fardeen Khan Divorce : बॉलिवूड अभिनेता फरदीन खान हा काही काळापूर्वी त्याच्या वाढत्या वजनामुळे चर्चेत होता. त्यानंतर फरदीननं इतकी जबरदस्त अशी ट्रान्सफॉर्मेश केली की ते पाहून अनेकांना आश्चर्य झाले. मात्र, आता फरदीन चर्चेत येण्याचे कारण हे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन नाही तर त्याचं वैवाहिक आयुष्य आहे. फरदीन आणि त्याच्या पत्नीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. त्या दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु असून ते वेगळे राहत असल्याचे देखील म्हटले जात आहे. फरदीन मुंबईत राहतोय तर नताशा लंडनमध्ये राहते. 

फरदीनच्या पत्नीचे नाव नताशा माधवानी आहे. नताशा ही 70-80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री मुमताज यांची लेक आहे. मुमताज यांनी 1974 मध्ये मयूर माधवानी यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुली असून तान्या आणि नताशा अशी त्यांची नाव आहेत. नताशा ही मुमताज यांची धाकटी लेक आहे. नताशा ही तिच्या आईच्या पावलावर पाऊन ठेवत चित्रपटसृष्टीत आली नाही. तर तिनं त्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.  ई-टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, सुत्रांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून ते दोघं वेगळे राहत आहेत. त्या दोघांमध्ये कोणत्या गोष्टीवरून दुरावा निर्माण झाला हे माहित नाही. पण त्या दोघांनी आता अखेर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. पण अजूनही त्या दोघांनी या बातमीवर दुजोरा दिलेला नाही किंवा काही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नताशा आणि फरदीनशी याविषयावर बोलण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तर त्यांनी सांगितलं की यावर सध्या त्यांना कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. फरदीन आणि नताशा यांनी 2005 साली आलिशान लग्न केलं होतं. दोघांचं लग्न हे त्यावेळी चर्चाचा विषय ठरला होता. त्यांच्या लग्नात मोठ्या मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. त्यांना दोनं मुलं असून त्यात एक मुलगी आणि एक मुलगा आहे. तर फरदीन आणि नताशा लग्नाच्या काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. लग्नाच्या 18 वर्षात दोघांनीही अनेकदा चढ-उतार पाहिले आहेत. फरदीन आणि नताशा यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा : परफॉर्मन्स दरम्यान प्रसिद्ध गायिकेनं चाहत्याला फेकून मारला माइक! पाहा धक्कादायक VIDEO

फरदीन विषयी बोलायचे झाले तर तो फिरोज यांचा मुलगा आहे. फरदीननं 'प्रेम आंगन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर त्यानं परदेशातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. 

Read More