Marathi News> मनोरंजन
Advertisement

'संजय लिला भन्साळी संतापल्यानंतर सेटवर 25 कुत्रे आणले जायचे अन्...', फरदीन खानचा मोठा खुलासा

अभिनेत्री अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) नुकतंच खुलासा केला आहे की, दिग्दर्शक संजय लिला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांना शांत ठेवण्यासाठी त्यांच्या टीमने विशेष काळजी घेतली होती. दरम्यान सेटवर कुत्र्यांची एक फौजच हजर होती.   

'संजय लिला भन्साळी संतापल्यानंतर सेटवर 25 कुत्रे आणले जायचे अन्...', फरदीन खानचा मोठा खुलासा

बॉलिवूड दिग्दर्शक संजय लिला भन्साळी 'हिरामंडी' वेब सीरिजमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपले भव्यदिव्य सेट आणि बिग बजेट चित्रपटांसाठी संजय लिला भन्साळी यांना ओळखलं जातं. दरम्यान चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान आपल्या संतप्त स्वभावासाठीही ते कुप्रसिद्ध आहेत. संजय लिला भन्साळी यांना कामात सर्व चोख लागत असल्याने अनेकदा ते संतापतात. त्यामुळेच वेब सीरिजच्या शूटदरम्यान त्यांच्या टीमवर त्यांना शांत ठेवण्याची विशेष जबाबदारी होती. 

अभिनेत्री अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) हिरामंडी वेब सीरिजमध्ये भूमिका निभावली आहे. नुकतंच तिने खुलासा केला आहे की, संजय लिला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांना शांत ठेवण्यासाठी त्यांच्या टीमने विशेष काळजी घेतली होती. दरम्यान सेटवर कुत्र्यांची एक फौजच हजर होती असा खुलासाही यावेळी तिने केला. IMDB ला हिरामंडीच्या कास्टने मुलाखत दिली. 

अभिनेता ताहा शाह बदुशा याने भन्साळी यांच्या कुत्र्यांच्या फौजेविषयीची ओढ उघड केली. त्यावर फरदीन खानने खुलासा केला की, “जेव्हा जेव्हा तो एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळून जायचे किंवा निराश व्हायचे तेव्हा सहाय्यक दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याकडे असलेल्या 25 कुत्र्यांना हीरामंडीच्या सेटवर पाठवायचे आणि ते सेटवर गेल्यावर ते लगेच शांत व्हायचे".

संजय लिला भन्साळी यांच्या फार माहित नसलेल्या गोष्टींबद्दल विचारण्यात आलं असता संजिदा शेखने सांगितलं की, "त्यांची अजून एक गोष्ट आहे. ते दिवसातून 3 ते 4 वेळा कुर्ता बदलतात. जेव्हा ते कुर्ता बदलतात तेव्हा त्यांच्या डोक्यात नवी कल्पना असते".

हीरामंडीची स्क्रिप्ट वाचल्यानंतर कोणता सीन शूट करण्याचं सर्वात जास्त दडपण होतं असं विचारण्यात आलं असता अभिनेत्री रिचा चढ्ढा स्क्रिप्टच्या अपारंपरिक स्वरूपावर जोर दिला. “स्क्रिप्ट म्हणजे सूचनांप्रमाणे होती. म्हणजे त्यात ‘लज्जो (ऋचाचे पात्र) मोठा डान्स करते’ असं लिहिलेलं असायचं. हे आठ दिवसांत शूट केले जाणार आहे आणि ते किती तणावपूर्ण, गुंतागुंतीचे, कठीण किंवा आनंददायक असेल हे तुम्हाला त्यावेळी माहिती नसतं".

“एक दिवस तर असा होता की आम्हाला एक सीन शूट करायचा होता ज्यामध्ये मला रडायचं होतं. हा सीन 4 दिवस शूट होत होता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला रडावे लागले. त्यामुळे सकाळी 9 वाजता रडायला लागायचो आणि रात्री 10 वाजता संपायचं. चौथ्या दिवसापर्यंत, माझे डोळे बटाट्यासारखे झाले होते,” असं भन्साळींची भाची शर्मीन सेगलने सांगितलं. शर्मीननेही हिरामंडीत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. 

दरम्यान या वेब सीरिजच्या निमित्ताने फरदीन खान 14 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. “एवढ्या मोठ्या अंतरानंतर संजय लीला भन्साळी यांच्यासारख्या दिग्दर्शकाकडून पाठिंबा मिळणं हे अभिनेत्याचं स्वप्न असतं. मी कमबॅक केल्यानंतर मला साइन करणारी पहिली व्यक्ती म्हणजे संजय गुप्ता. आता मी दोन संजयसोबत काम केलं आहे. “हीरामंडी: द डायमंड बझार” हा दुसरा प्रोजेक्ट होता ज्यासाठी मी शूट केले होते. पण तो माझा पहिला रिलीज होणार आहे. एका कुशल कारागिराच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळणे हे विशेष होतं,” असं फरदीन म्हणाला आहे. 

Read More