Marathi News> मनोरंजन
Advertisement

Inside Video : करण जोहरचा बेडरूम इतका मोठा की एखाद्याचं अख्खं घर सामावेल; वॉडरोबमधील कपडे पाहून व्हाल हैराण

Farah Khan on Karan Johar's Home Tour : फराह खाननं शेअर केलेल्या व्हिडीओला पाहून फराह खानपासून नेटकरी आश्चर्यचकीत.... 

Inside Video : करण जोहरचा बेडरूम इतका मोठा की एखाद्याचं अख्खं घर सामावेल; वॉडरोबमधील कपडे पाहून व्हाल हैराण

Farah Khan on Karan Johar's Home Tour : बॉलिवूडची लोकप्रिय कोरियोग्राफर आणि निर्माती फराह खान नुकतीच दिग्दर्शक करण जोहरच्या घरी गेली होती. त्याच्या घरातील एक व्हिडीओ फराहनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्या व्हिडीओतून तिनं करणच्या घराची एक झलक दाखवली आहे. हा व्हिडीओ पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. इतकंच नाही तर स्वत: फराह म्हणाली की ती गरीब आहे, असं म्हणू लागली. 

फराहनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला करण डान्स करताना दिसतो. तर त्यानंतर फराह बोलताना दिसते की "आज आपण करण जोहरचं क्लॉजेट पाहणार आहोत." करण त्याच्या क्लॉजेटची टूर करत असताना बोलतो की "माझ्या क्लॉजेटमध्ये जाण्यासाठी तुम्हाला माझ्या बेडरुममधून जावं लागेल." तर करणचा बेडरुम हा देखील त्याच्या घराप्रमाणं लॅविश आहे. त्यानंतर करण त्याचं क्लॉजेट दाखवतो. त्यावेळी त्याचे वेगवेगळे कलेक्शन करण दाखवताना दिसतो. ते पाहून सुरुवातीलाच फराहला आश्चर्य होतं आणि ती बोलते की "मी गरीब आहे." पुढे हळू हळू करण आणखी पुढे त्याच्या कपाटातील वेगवेगळ्या बाजून उघडता दिसतो. तर फराह पुन्हा बोलते की "मला फार गरीब असल्याचं वाटू लागलं आहे." त्यानंतर करण त्याचं एक कपाट उघडण्याचं प्रयत्न करतो पण त्याच्याकडून ते उघडलं जातं नाही. हे पाहता फराह बोलते "आधी तू कपाटातून बाहेर येऊ शकत नव्हता आणि तू कपाटात जाऊ शकत नाही." त्यानंतर करण तिला शिमरी जॅकेट्स आणि कपडे दाखवतो. त्यावर उत्तर देत फराह म्हणजे की "तुझ्याकडे शावा शावा या गाण्यातील सगळ्या डान्सर्सचे कपडे आहेत." 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : सुपरहिट चित्रपट दिले, तरी सुपरस्टार झाला नाही कपूर कुटुंबातील 'हा' अभिनेता

फराहचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सेलिब्रिटींनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. हृतिक रोशन, श्रेया घोषाल, मलायका अरोरापासून अर्चना पूरन सिंह पर्यंत अनेक कलकारांनी हसण्याचं इमोजी शेअर केलं आहे. तर एक नेटकरी म्हणाला, "तुझा सेन्स ऑफ ह्युमर हा फार चांगला आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "या दुकानाचा पत्ता मिळेल का?" तिसरा नेटकरी म्हणाला, "फक्त मी एकटाच आहे का ज्याला वाटतं की करणकडे या पेक्षा जास्त कपडे असतील की मी एकटाच आहे." तर अनेकांनी फराहच्या  "आधी तू कपाटातून बाहेर येऊ शकत नव्हता आणि तू कपाटात जाऊ शकत नाही." हे वाक्य आवडल्याचं म्हटलं आहे.

Read More