Marathi News> मनोरंजन
Advertisement

फराह खानकडे घालायला कपडे नव्हते कळताच 'हा' दिग्दर्शक आला धावून

Farah Khan : फराह खाननं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याविषयी खुलासा केला आहे. 

फराह खानकडे घालायला कपडे नव्हते कळताच 'हा' दिग्दर्शक आला धावून

Farah Khan : बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शिक फराह खान तिच्या गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिला आपण शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या चित्रपटासाठी प्रमोशन करताना पाहिलं. फराह ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी तिनं व्हिडीओ शेअर करत खुलासा केला आहे की तिच्याकडे कपडे नव्हते त्यामुळे तिचा चांगला मित्र आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरनं तिला कशी मदत केली आहे. 

फराहनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला काही लोक दिसत आहेत. जे कपडे नीट लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिनं सांगितलं आहे की 'करणनं तिला दिवाळी गिफ्ट दिलं आहे. फराह समोर कपड्यांनी भरलेला एक रुम आहे. तर बॅकग्राऊंडला फराह आहे आणि ती बोलताना दिसते की 'मी करण जोहरला म्हणाले की, माझ्याकडे दिवाळीला घालण्यासाठी काहीच नाही आहे आणि बघा त्यानं काय केलं. त्यानं लोकप्रिय स्टायलिस्ट एखा लखानीला माझ्या घरी पाठवलं आहे. हे पाहा, किती सारे कपडे आहेत. यात मी माझ्या संपूर्ण क्रूसोबत मिळून चित्रपट बनवू शकते.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे या व्हिडीओत एखा लखानी बोलताना दिसते की 'एखा मला दिवाळीसाठी फक्त एक ड्रेस पाहिजे. ज्यावर एखा उत्तर देत बोलते की वजन कमी केल्यानंतर तू खूप सुंदर दिसते. त्यामुळे मला असं वाटतं की तू वेगवेगळे कपडे ट्राय करून पाहायला हवे. अशात फराह लगेच बोलते की त्यामुळेच मी हे रील बनवते. थॅंक्यू. तुला आता आणखी काही बोलण्याची गरज नाही.'

हेही वाचा : 13 वर्षांनी मोठा असलेल्या आदित्यला डेट करते अनन्या! सारा अली खानकडूनच झाला खुलासा?

फराह खानचा हा व्हिडीओ सेलिब्रिटींमध्ये प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट कमेंट करताना दिसत आहे. 'फराह खान खूप लकी आहे की तिच्याकडे करण जोहर आणि शाहरुख खानसारखा एवढा चांगला मित्र आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'माझ्याकडेपण असे मित्र हवे होते.' तिसरा नेटकरी म्हणाला,'महिला, महिलांकडे नेहमीच घालण्यासाठी काही नसतं.'

Read More