Marathi News> मनोरंजन
Advertisement

तब्बल 72 कोटींची संपत्ती संजूबाबाच्या नावावर करून मराठमोळ्या चाहतीनं घेतला अखेरचा श्वास; अभिनेत्याला कळलं आणि....

Bollywood news : एके दिवशी फोन आला आणि पोलीस म्हणाले, तुमच्या नावावर 72 कोटींची संपत्ती केलीये. त्यावेळी संजय दत्तची काय अवस्था झाली? कोणा अनोळखी व्यक्तीनं असं काहीतरी करणं याचा नेमका अर्थ काय?   

तब्बल 72 कोटींची संपत्ती संजूबाबाच्या नावावर करून मराठमोळ्या चाहतीनं घेतला अखेरचा श्वास; अभिनेत्याला कळलं आणि....

Sanjay Dutt : कलाकारांप्रती चाहत्यांचं प्रेम अनेक मार्गांनी आणि अनेक स्वरुपात आजवर आपण पाहिलं आहे. आपल्या आवडीच्या कलाकाराला एकदातरी भेटावं, त्याच्यासोबत फोटो काढावा आणि त्या आठवणी आयुष्यभरासाठी जपाव्या असं प्रत्येक चाहत्यांला वाटतं. अनेकांचं हे स्वप्न साकारही होतं. बरं या चाहत्यांमध्येही प्रकार आहेत. काही चाहते आम्हाला अमुक एक अभिनेता किंवा अभिनेत्री आवडते इतकं म्हणून शांत राहतात. तर, काहीजण मात्र आवडच्या कलाकारांसाठी चौकटीबाहेर जाऊन काही ना काही करताना दिसतात. 

बॉलिवूडचा (Bollywood) 'खलनायक', अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt Movies) याच्याही आयुष्यात असे असंख्य चाहते आले. यातले अनेकजण त्याच्या लक्षातही नसतील. पण, एक नाव मात्र तो कधीच विसरु शकणार नाही. संजूबाबा इतर अनेक गोष्टी विसरेल पण, या चाहतीला मात्र विसरणं त्याला निव्वळ अशक्य. कारण? कारण तिनं केलेलं एक काम. 

2018 मध्ये नेमकं काय झालं होतं? 

ही घटना आहे 2018 मधील. ज्यावेळी पोलिसांनी संजय दत्तला फोन केला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. निशा पाटील नावाच्या अनोळखी महिलेचं काही दिवसांपूर्वी निधन झालं हे सांगत त्यांच्या पश्चात त्यांची संपत्ती तुमच्या नावे केल्याची माहिती देण्यासाठी तो फोन संजूबाबाला आला होता. 62 वर्षीय निशा त्यावेळी मुंबईतील मलबार हिल भागात राहत होत्या आणि त्या संजय दत्तच्या चाहत्या होत्या. 

बँक ऑफ बडोदाशी (Bank of baroda) ईमेलच्या (Email) माध्यमातून संपर्क साधत आणि आपल्या पश्चात संपत्तीचा हक्क संजय दत्तकडे असल्याचं स्पष्ट केलं होतं. निशा यांनी त्यांच्या निधनापूर्वी 72 कोटी रुपयांची संपत्ती संजयच्या नावे केल्याची बाब मृत्यूपत्रात नमूद केली होती. यामध्ये त्यांनी बँकेच्या लॉकरमध्ये (Bank Locker) ठेवलेल्या दागिन्यांचाही समावेश होता.

हेसुद्धा वाचा : Sooryavansham : 14 वर्षे बांधकाम, 35 खोल्या; ठाकूर भानुप्रताप सिंह यांची हवेली पाहिलीत का?

15 जानेवारी 2018 ला निशा यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या एक गृहिणी होत्या. भावंड आणि 80 वर्षांच्या आईसोबत त्या मलबार हिल येथे वास्तव्यास होत्या. निशा यांच्या शोकसभेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मृत्यूपत्रांचं कुटुंबीयांसमोर वाचन करण्यात आलं. ज्यावेळी पूर्णपणे अनभिज्ञ असणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना संपत्तीच्या हक्कांविषयीची माहिती मिळाली. संजय दत्तला ज्यावेळी ही बाब लक्षात आली तेव्हा त्यानं अतिशय जबाबदारीनं निशा यांच्या संपत्तीचा संपूर्ण भाग त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. एका चाहतीनं आपल्यासाठी उचललेलं हे पाऊल त्याच्या मनात कायमचं घर करून गेलं हे मात्र नक्की. 

Read More