Marathi News> मनोरंजन
Advertisement

Fact Check : अभिनेत्री प्राजक्ता माळीला गुटखा खायची सवय?

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. यावेळी ही अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

Fact Check : अभिनेत्री प्राजक्ता माळीला गुटखा खायची सवय?

मुंबई :  मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज रानबाजार गेल्या वर्षी प्रदर्शित झाली. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसला होता हे नक्की. दिग्दर्शक अभिजित पानसे  एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला आले आहेत. पानसे यांच्या 'रानबाजार' टीझरनेही धुमाकूळ घातला होता. हा टीझर रिलीज होताच मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं म्हटलं जात होतं.

सत्य घटनांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळाल्या. ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येताच धुमाकूळ घातला. अवघ्या काही वेळातच या वेबसिरीजचा सगळीकडे बोलबाला झाल्याचंही पाहायला मिळालं. या सिरीजमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितने बोल्ड भूमिका साकारल्या होत्या. या दोघींच्याही अभिनयाचं सगळीकडून कौतूकही झालं होतं. आज आम्ही तुम्हाला

अभिनेत्री (Prajakta Mali) प्राजक्ता माळी 'रानबाजा' (Raanbaazaar) या वेबसीरिजच्या (Webseries) माध्यमातून एका बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर आली. तीच्या या वेबसीरिजमधील भूमिकेचं प्रचंड कौतुक केलं. कलाकारांना अनेकदा भूमिका आत्मसात करण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. अश्याच प्रकारे प्राजक्ता माळीने या भूमिकेसाठी तिने नेमकं काय-काय केलं याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्राजक्ताने 'रानबाजार' या वेबसीरिजमधील तिच्या रत्ना या भूमिकेसाठी तब्ब्ल सात-आठ किलो वजन वाढवलं होतं. या वेबसीरिजमध्ये वेश्यांची (prostitute) भूमिका साकारत असल्याने तिसारखी चाल, बोलणं यावरही तिने बरच काम केलं. या वेबसिरीजमध्ये रत्ना या भूमिकेसाठी तिला व्यसन असल्याचं सुद्धा दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे तिला गुटखा खायची तालीम सुद्धा तिला करावी लागली.  मात्र खऱ्या आयुष्यात प्राजक्ता खूप प्रामाणिक अभिनेत्री आहे. 

प्राजक्ताने या संबंधित एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती ज्यात ती म्हणाली आहे की,   Vanity मध्ये बसून बडीशेप खात मसाला गुटखा वगैरे खातेय असं भासवण्याची practice… 
(ह्या दिवशी पहिल्यांदा make up केला होता… सुंदर दिसण्यासाठी नाही अर्थात..) 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गोंडस प्राजक्ताला बोल्ड भूमिकेत पाहून सुरुवातीला खरंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण तिच्याया धाडसाचं अनेकांनी कौतुकही केलं होतं. रानबाजार ही वेबसिरीच खूप गाजली. याचबरोबर प्रेक्षक या वेबसिरीजच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read More