Marathi News> मनोरंजन
Advertisement

Bigg Boss ची Ex कंटेस्टंट महक चहलचा बाथटब सीन झाला लीक

बिग बॉसची माजी कंटेस्टंट राहिलेली अभिनेत्री महक चहलचा आगामी सिनेमातील बाथटब सीन लीक झालाय. सिनेमा रिलीज होण्याआधी हा सीन लीक झाल्याने महक चांगलीच अपसेट झाली आहे. 

Bigg Boss ची Ex कंटेस्टंट महक चहलचा बाथटब सीन झाला लीक

मुंबई : बिग बॉसची माजी कंटेस्टंट राहिलेली अभिनेत्री महक चहलचा आगामी सिनेमातील बाथटब सीन लीक झालाय. सिनेमा रिलीज होण्याआधी हा सीन लीक झाल्याने महक चांगलीच अपसेट झाली आहे. 

बाथटब सीन लीक

आएएनएसनुसार, महक, अरबाज खान याच्या ‘निर्दोष’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे सह-दिग्दर्शक प्रदीप रंगवानी आणि सुब्रतो पॉल आहे. या सिनेमात अरबाज खान आणि मंजरी फडणीस यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

महकला धक्का

आयएएनएसनुसार महक म्हणाली की, ‘क्लिप लीक झाल्याचं मला माझ्या मैत्रीणीने सांगितले तेव्हा मला धक्काच बसला. माझ्या नंतर लक्षात आलं की, हा सीन माझ्या आगामी ‘निर्दोष’ सिनेमातील आहे. मी नंतर ही बाब दिग्दर्शकांना सांगितली. ते आता याबाबत चौकशी करत आहेत. आम्ही कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत हा सीन शूट केला होता. मी पहिल्यांदाच असा सीन शूट केलाय’.

fallbacks

१९ ला येतोय सिनेमा

‘निर्दोष’ हा सिनेमा थ्रिलर सस्पेन्स जॉनरचा असून येत्या १९ जानेवारीला रिलीज होणार आहे. महक याआधी सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या सिनेमात पाहिलं गेलंय. त्यासोबतच महक बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्येही दिसली होती. 

Read More