Marathi News> मनोरंजन
Advertisement

एक लडकी को देखा तो ऐसा लगाचा ट्रेलर प्रदर्शित

पाहा याचा ट्रेलर 

एक लडकी को देखा तो ऐसा लगाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या आगामी सिनेमा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' 1 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होत आहे. सोनम कपूर पहिल्यांदाच आपल्या वडिलांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा शैली चोप्राने दिग्दर्शित केला असून या सिनेमाची निर्मिती विधु विनोद चोप्रा करणार आहे.  

या सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. ट्रेलरची सुरूवात राजकुमार रावच्या डायलॉगने होते. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. कारण हा सिनेमा रोमँटिक असूनही बाप - बेटीच्या नात्याची कथा आहे. 

अनिल कपूरच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी पर्वणी आहे. तसेच अनिल कपूर यांच्यासोबत जुही चावला देखील आपल्याला या सिनेमात दिसणार आहे. 

2 मिनिटे 34 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये तुम्हाला कॉमेडी देखील पाहायला मिळणार आहे. तसेच इमोशनल ड्रामा देखील असणार आहे. या सिनेमाचा टिझर याचवर्षी रिलीज झाला होता तर ट्रेलर आज झाला आहे. 

या सिनेमात 1942 अ लव्ह स्टोरी या अनिल कपूर यांच्या सिनेमातील अनेक सिन आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिनेमात अनिल कपूर आणि जुही चावलाची जोडी वेगळ्याच अंदाजात दिसली आहे. अनिल कपूर यांच्या वाढदिवशी या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. ज्यामध्ये अनिल कपूर आणि सोनम कपूर दिसत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#poster #terbaru #film #EkLadkiKoDekhaTohAisaLaga Photo: @sonamkapoor

A post shared by Nor Anifah (@seputar_bollywood) on

सोनम कपूरसोबत काम करण्याचा अनुभव खूप वेगळा आणि खास होता अशा भावना अनिल कपूर यांनी शेअर केल्या आहेत.

Read More