Marathi News> मनोरंजन
Advertisement

अरेरे... इतके पैस कमवूनही या बॉलिवूड स्टार्सकडे नाही स्वतःचं घर

कोण आहेत हे स्टार? जाणून घ्या 

अरेरे... इतके पैस कमवूनही या बॉलिवूड स्टार्सकडे नाही स्वतःचं घर

मुंबई : मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सामान्य व्यक्ती काटकसर करन आपली इच्छा पूर्ण करतो. पण काही बॉलिवूडकर बक्कळ पैसा असूनही भाड्याच्या घरात राहतात आणि लाखो रूपयं भाडं भरतात. भाड्याने राहणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये अभिनेता ऋतिक रोशन रोशन देखील आहे. तर जाणून घ्या हे स्टार महिन्याला किती भाडं भरतात. 

अभिनेता ऋतिक रोशन

fallbacks


कोट्यावधी रूपयांचा मालक असताना देखील ऋतिक जुहूमधील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहात होता. ऋतिकज्या ठिकाणी भाड्याने राहात होता त्याच्या शेजारी अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा बंगला आहे. मिळालेल्या  माहितीनुसार ऋतिक त्या अपार्टमेंटसाठी महिन्या तब्बल 8 लाख 25 हजार रूपये भाडं भरत होता. 

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस

fallbacks


 जॅकलीन सी-फेसिंग 5 बेडरूम असलेल्या घरात राहात होती. जे घर अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि पती नीक जोनस यांनी लीजवर घेतलं होतं. जॅकलीन या घरासाठी महिन्या तब्बल 6 लाख 78 हजार रूपये भाडं भरत होती. 

अभिनेत्री कतरीना कैफ

fallbacks

कतरीना वांद्रे याठिकाणी राहते. शिवाय ती राहत्या घरासाठी 15 लाख रूपये महिन्याचं भाडं देते. 

अभिनेत्री परिणीति चोप्रा

fallbacks


परिणीती तिच्या स्वप्नांचं घर शोधत आहे. सध्या ती मुंबईमध्ये 2 बेडरूम असलेल्या घरात राहते. 

अभिनेता विद्युत जामवाल

fallbacks

 प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवू इच्छित नसल्यामुळे भाड्याच्या घरात राहतो. 

Read More