Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aryan Khan Drugs Case : आर्यनला आजही जामीन नाहीच; पाहा केव्हा होणार पुढील सुनावणी

सुटकेस प्रतिज्ञापत्राच्या मार्फत विरोध

Aryan Khan Drugs Case : आर्यनला आजही जामीन नाहीच; पाहा केव्हा होणार पुढील सुनावणी

मुंबई : ड्रग्ज केस प्रकरणी कारावासात असणाऱ्या आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जाची सुनावणी बुधवारीसुद्धा अपूर्णच राहिली. ज्यामुळं आर्यनचा जेलमधील मुक्काम आणखी एका दिवसानं वाढला आहे. 

आर्यन, अरबाज आणि मूनमूनच्या वकिलांनी या प्रकरणामध्ये त्यांचाय युक्तिवाद मांडला. पण, अद्यापही एनसीबीचा युक्तिवाद बाकी असल्यामुळं ही सुनावणी पुढे गेली आहे. 

एनसीबीनं या तिघांच्या सुटकेस प्रतिज्ञापत्राच्या मार्फत विरोध केला आहे. 

तेव्हा आता युक्तिवादात या यंत्रणेकडून कोणते मुद्दे मांडण्यात येतील यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. तूर्तास आर्यनच्या पुढे असणाऱ्या अडचणी काही केल्या कमी झालेल्या नाहीत हेच अधिक स्पष्ट होत आहे. 

पाहा युक्तिवादात काय म्हटलं गेलं? 
आर्यन, अरबाज आणि मूनमूनच्या वतीनं अमित देसाई आणि मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात युक्तिवाद मांडला. ज्यामध्ये त्यांची बाजू विविध मुद्द्यांच्या अनुषंगानं स्पष्ट करण्यात आली. 

हा कटकारस्थानाचा भाग नसून हा ट्रॅप आहे असं सांगत drugs घेणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी ncb अधिकारी तिकडे गेले होते तर blood test का करण्यात आली नाही, हा सवाल अरबाजच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला. 

ज्याची कबुली देण्यात आली नाही त्यासाठी अटक करण्यात आली आहे, हा मुद्दा इथे अधोरेखित करण्य़ात आला. 

Read More