Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 2' सुसाट, तब्बल इतक्या कोटींची कमाई!

अजय देवगणचा गेल्या वर्षी सुभेदार तान्हाजीनंतर हा दुसरा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरू शकतो.

 बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 2' सुसाट, तब्बल इतक्या कोटींची कमाई!

Drishyam 2 Box Office Collection : कोरोना (Corona) महामारीनंतर बॉक्स ऑफिसवर (Box Office) बॉलिवूडचे अनेक चित्रपट फार काही चाललेले दिसले नाहीत. उलट या चित्रपटांना साऊथच्या चित्रपटांनी चांगलीच कमाई केलेली दिसली. (Drishyam 2 Full Movie) मात्र नुकताच प्रदर्शित झालेला दृश्यम 2 हा (Drishyam 2 Box Office Collection) चित्रपट मोठा गल्ला जमावणार असल्याचं दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच कमी दिवसात मोठ्या आकड्यांना मागे टाकताना दिसत आहे. (Drishyam 2 grossed 160 crores at the box office Latets marathi news)

'दृश्यम' हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अजूनही 2 ऑक्टोबरला सत्संगवरून सोशल माध्यमांवर मीम्स व्हायरल होत असतात. त्यामुळे दृश्यम 2 बॉक्स ऑफिसवर कितपत यश मिळवतो याची प्रत्येकाला उत्सुकता होती. चित्रपट आता चांगला गल्ला जमवत नवे उच्चांक गाठताना दिसत आहे. 

आत्तापर्यंत 'दृश्यम 2' ने बॉक्स ऑफिसवर 160 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचे बोललं जात आहे. अवघ्या दोन आठवड्यात अजय देवगणच्या या चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाचा अप्रतिम थ्रिलर सस्पेन्स प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचत आहे. जवळपास 1 कोटी लोकांनी हा सिनेमा सिनेमागृहात पाहिला आहे. अजय देवगणचा गेल्या वर्षी सुभेदार तान्हाजीनंतर हा दुसरा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरू शकतो. 

दरम्यान, 'दृश्यम 2' मध्ये अजय देवगणने त्या हत्येबाबत पोलिसांना माहिती दिली की नाही? याबाबत प्रत्येकाला उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना थ्रिल अनुभवायचा आहे, कदाचित या कारणामुळेच प्रेक्षक मोठ्या संख्येने सिनेमागृहात जात आहेत.

Read More