Marathi News> मनोरंजन
Advertisement

Diwali निमित्त खास ऑफर, दृश्यम 2 च्या प्री तिकीट बुकिंगवर मोठी सूट

Drishyam 2 Movie दृश्यम 2 सिनेमा पाहण्यासाठी उत्सूक आहात तर तुमच्यासाठी ही खास ऑफऱ

Diwali निमित्त खास ऑफर, दृश्यम 2 च्या प्री तिकीट बुकिंगवर मोठी सूट

Entertainment News : दृश्यम 2 च्या प्री-बुकिंगवर भरघोस सूट मिळणार आहे. अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'दृश्यम 2' चे निर्मात्यांनी दिवाळीला प्रेक्षकांसाठी गुडन्यूज दिली आहे. ऑफर ऐकूऩ अनेक चाहते देखील खूश झाले आहेत. दृश्यम 1 हिट ठरल्यानंतर आता प्रेक्षकांमध्ये दृश्यम 2 बाबत उत्सूकता दिसून येत आहे. त्यामुळे ही उत्सूकता लक्षात घेता चित्रपट निर्मात्यांनी देखील प्रेक्षकांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. (discount on advance booking of Drishyam 2)

दृश्यम 2 च्या बुकिंगवर खास ऑफर 

कोरोनानंतर चित्रपटगृहाकडे बऱ्याच प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. अनेक जण ओटीटीवर आता सिनेमा पाहणे पसंत करतात. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच निमित्ताने तिकिटांच्या किमतींवर सूट दिली जात आहे. चित्रपट निर्माते प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर घेऊन येत आहेत. दरम्यान, दिवाळीच्या मुहूर्तावर आणखी एक ऑफर आली आहे जी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

गांधी जयंतीच्या निमित्ताने, अजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना आणि श्रिया सरन स्टारर 'दृश्यम 2' च्या निर्मात्यांनी 2 ऑक्टोबर रोजी चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगसाठी विशेष ऑफर दिली होती. या दिवशी बुकिंग करणाऱ्यांना थेट तिकिटात 50 टक्के सूट देण्यात आली होती. या थ्रिलर चित्रपटासाठी तुमचे सवलतीचे तिकीट खरेदी करण्याची संधी गमावली असल्यास, आता तुमच्यासाठी आणखी एक संधी आहे. निर्माते आणखी एक रोमांचक ऑफर घेऊन परत आले आहेत.

'दृश्यम 2'च्या निर्मात्यांनी दिवाळीनिमित्त बुक केलेल्या तिकिटांवर 25% सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ही ऑफर 24 ऑक्टोबर (सोमवार) आणि 25 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी केलेल्या आगाऊ बुकिंगवर लागू आहे. तुम्ही हा सस्पेन्स थ्रिलर पाहण्याचा विचार करत असाल, तर या दिवाळीत तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी खास किमतीत तिकिटे बुक करा.

'दृश्यम 2' ची निर्मिती भूषण कुमार यांच्या टी-सिरीज आणि पॅनोरमा स्टुडिओने केली आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना, श्रिया सरन आणि रजत कपूर हे स्टार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'दृश्यम 2' हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यात सुपरस्टार मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत.

Read More