Marathi News> मनोरंजन
Advertisement

ठग्स ऑफ हिंदुस्तान सिनेमासाठी दिवाळी शुभ की अशुभ?

पाहा कोणते सिनेमे 

ठग्स ऑफ हिंदुस्तान सिनेमासाठी दिवाळी शुभ की अशुभ?

मुंबई : 2018 मध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झालेला 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा अनेक गोष्टींनी खास आहे. या सिनेमात इंडस्ट्रीमधील दिग्गज आमिर खान आणि अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. तसेच हा बिग बजेटचा सिनेमा असून यावर्षातील दुसरी पीरियड ड्रामा फिल्म आहे. दिवाळीच्या दिवसात प्रदर्शित होणारा सिनेमा कायमच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो. त्यामुळे आता 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. 

गेल्या 10 वर्षांत दिवाळीच्या काळात प्रदर्शित झालेल्या सिनेमांवर जर नजर टाकली तर असे काही सिनेमे आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर निराशा केली आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या दिवशी आमीर खानचा 'सिक्रेट सुपरस्टार' हा कमी बजेटचा सिनेमा असूनही प्रेक्षकांना आवडला. तर रोहित शेट्टीचा 'गोलमाल अगेन' हा सिनेमा अगदी मालामाल करणारा ठरला. 

2016 मध्ये दोन मोठे सिनेमे रिलीज झाले. करण जोहरचा 'ऐ दिल है मुश्किल' आणि अजय देवगनचा 'शिवाय'. करण जोहरच्या सिनेमाने चांगली कमाई केली. पण शिवाय हा सिनेमा हिट ठरला नाही. पण या सिनेमाचं नुकसान देखील झालं नाही. 

2015 च्या दिवाळीत सलमान खानचा 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाने जवळपास 207 करोड कमाई केली आहे. तर 2014 मध्ये दिवाळीत रिलीज झालेला शाहरुख खान आणि  दीपिका पादुकोणचा 'हैप्पी न्यू ईयर' ने जवळपास 205 करोडचा बिझनेस केला आहे. 

Read More